नवी दिल्ली, 13 एप्रिल : Oppo ने भारतात दोन नवे स्मार्टफोन Oppo F21 Pro आणि Oppo F21 Pro 5G लाँच केले आहेत. या दोन फोनसह Oppo Enco Air 2 Pro TWS ईयरबड्सही लाँच केले आहेत. Oppo F21 Pro भारतात 22,999 रुपयांच्या सुरुवाती किमतीत लाँच करण्यात आला आहे. हा ओप्पोचा लेटेस्ट मिड-रेंज फोन आहे. हे 4G मॉडेल आहे. पण तुम्ही 5G वेरिएंट पाहत असाल, तर Oppo F21 Pro च्या 5G मॉडेलचाही पर्याय आहे. याची किमत 25000 रुपयांहून अधिक आहे.
Oppo F21 Pro 4G मॉडेलला स्नॅपड्रॅगन 680 SoC प्रोसेसर आहे. तर Oppo F21 Pro 5G ला स्नॅपड्रॅगन 695 SoC प्रोसेसर आहे. Oppo F21 Pro मध्ये 6.4 इंची फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. Android 12 बेस्ड असून ColorOS 12 वरही काम करतो. फोनला 4,500 mAh बॅटरी असून 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
कॅमेरा -
फोनला रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि दोन 2 मेगापिक्सलचे सेंसर आहेत. तसंच सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.
काय आहे किंमत -
Oppo F21 Pro 4G च्या सिंगल 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. फोन कॉस्मिक ब्लॅक आणि सनसेट ऑरेंज अशा दोन रंगात उपलब्ध आहे.
Oppo F21 Pro 5G च्या 8GB + 128GB कॉन्फिगरेशन असणाऱ्या फोनची किंमत 26,999 रुपये आहे. कॉस्मिक ब्लॅक आणि रेनबो स्पेक्ट्रम शेड्समध्ये फोन उपलब्ध आहे.
Oppo F21 Pro 4G ची विक्री 15 एप्रिलपासून सुरू होईल. तर Oppo F21 Pro 5G ची विक्री 21 एप्रिलपासून सुरू होईल. ग्राहकांना सुरुवातीला लाँच डिस्काउंट 10 टक्के बँक कॅशबॅक मिळेल. तसंच नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही निवडता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Oppo, Oppo smartphone, Tech news