मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Smartphone चा असा वापर जीवावर बेतू शकतो, तुम्हालाही या सवयी आहेत का?

Smartphone चा असा वापर जीवावर बेतू शकतो, तुम्हालाही या सवयी आहेत का?

सतत वापरल्या जाणाऱ्या फोनचा ब्लास्ट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. फोन ब्लास्ट होण्यामागे अनेक कारणं आहेत. युजरच्याच चुकीच्या वागणुकीमुळे किंवा वापरामुळेही फोन ब्लास्ट होऊ शकतो.

सतत वापरल्या जाणाऱ्या फोनचा ब्लास्ट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. फोन ब्लास्ट होण्यामागे अनेक कारणं आहेत. युजरच्याच चुकीच्या वागणुकीमुळे किंवा वापरामुळेही फोन ब्लास्ट होऊ शकतो.

सतत वापरल्या जाणाऱ्या फोनचा ब्लास्ट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. फोन ब्लास्ट होण्यामागे अनेक कारणं आहेत. युजरच्याच चुकीच्या वागणुकीमुळे किंवा वापरामुळेही फोन ब्लास्ट होऊ शकतो.

नवी दिल्ली, 12 एप्रिल : स्मार्टफोन लोकांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचा भाग झाला आहे. आता फोन केवळ बोलण्यासाठीच नाही, तर इतर अनेक काम त्यावर केली जातात. अगदी मिनिटां-मिनिटाला सतत वापरल्या जाणाऱ्या फोनचा ब्लास्ट झाल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. फोनवर बोलताना, चार्गिंगला असताना, पॉकेटमध्ये असताना अशा अनेकवेळी ब्लास्ट झाले आहेत.

फोन ब्लास्ट होण्यामागे अनेक कारणं आहेत. युजरच्याच चुकीच्या वागणुकीमुळे किंवा वापरामुळेही फोन ब्लास्ट होऊ शकतो. रात्रभर फोन चार्जिंगला (smartphone charging) लावणं, चार्जिंग सुरू असताना फोनवर बोलणं अशी कारणं ब्लास्टमागे असू शकतात. स्मार्टफोन वापरासंबंधीच्या अशा अनेक घटना युजरसाठी जीवघेण्या ठरू शकतात.

चार्जिंगवेळी गेम खेळणं किंवा फोनवर बोलणं -

स्मार्टफोन चार्जला लावल्यानंतर तो वापरू नये ही सामन्य बाब सर्वांना माहिती आहे. पण तरीही अनेक युजर्स फोन चार्जिंगला लावून वापरतात, गेम खेळतात किंवा कॉलवर बोलतात. हेच नेमकं जीवघेणं ठरू शकतं. चार्जिंगवेळी स्मार्टफोनमधून हीट बाहेर येते. अशात त्याचा वापर केला तर फोन ओव्हर हीट होण्याचा धोका असतो. यामुळे फोन खराबही होऊ शकतो आणि ब्लास्टचाही धोका निर्माण होतो.

ओव्हर नाइट चार्जिंग -

अनेकांना रात्री झोपताना फोन चार्जिंगला लावण्याची सवय असते. रात्री चार्जला लावल्यानंतर तो थेट सकाळी उठल्यावर काढला जातो. असा स्मार्टफोन रात्रभर चार्जिंगला लावणं धोकादायक ठरतं. सध्याच्या लेटेस्ट फोनमध्ये कंपन्या असं फीचर देतात ज्यात फोन फुल चार्ज झाल्यानंतर फोन चार्जिंगमधून आपोआप डिस्कनेक्ट होतो. पण तरीही सगळ्याच डिव्हाइसमध्ये ही सुविधा नसते. रात्रभर चार्जला लावल्यानंतर फोनमध्ये आगही लागू शकते. फोनला आग लागल्याच्या घटनांमध्ये ओव्हर नाइट चार्जिंग ही मोठी चूक ठरते.

अनेक जण फोन चार्जिंगला लावतात आणि तो बेडवर तसाच ठेवतात किंवा काही जण उशीखालीही फोन ठेवतात. फोन बेडवर ठेवून चार्ज करणं, उशीखाली ठेवणं हेदेखील धोकादायक आहे. फोन कधीही चार्जिंगवेशी कोणत्याही वस्तूखाली ठेवू नका.

तसंच, ज्या फोनचं जे चार्जर आहे तेच चार्जर वापरणं गरजेचं आहे. दुसऱ्या फोनच्या चार्जरमुळे बॅटरी किंवा फोन खराब होऊ शकतो. फोनला कोणतंही लोकल चार्जर न वापरता कंपनीचं चार्जर वापरणं फायद्याचं ठरतं.

First published:

Tags: Smartphone, Tech news