• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • भारतीय मोबाईल युजर्सच्या फोनला मालवेअर अटॅकचा धोका; रिपोर्टमध्ये मोठा खुलासा, हा Malware कसा ओळखाल?

भारतीय मोबाईल युजर्सच्या फोनला मालवेअर अटॅकचा धोका; रिपोर्टमध्ये मोठा खुलासा, हा Malware कसा ओळखाल?

भारतीय युजर्सच्या मोबाईल फोन्सवर मालवेअर अटॅक वाढत आहेत. जवळपास 4627 भारतीय युजर्सच्या मोबाईल फोनमध्ये Stalkerware चा अटॅक झाला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 एप्रिल: युजर्सचा डेटा लीक होणं, डिव्हाईसवर व्हायरसचा अटॅक होणं अशा गोष्टी गेल्या कित्येक दिवसांपासून सतत समोर येत आहेत. एका रिपोर्टनुसार, भारतीय युजर्सच्या मोबाईल फोन्सवर मालवेअर अटॅक वाढत आहेत. जवळपास 4627 भारतीय युजर्सच्या मोबाईल फोनमध्ये Stalkerware चा अटॅक झाला आहे. हा एक प्रकारचा सिक्रेट सॉफ्टवेअर किंवा स्पायवेअर प्रोग्राम आहे, जो युजरवर नजर ठेवतो आणि लोकेशन एक्सेस करतो. या प्रोग्रामद्वारे युजरची अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक केली जाऊ शकते. अनेक Stalkerware अ‍ॅप आहेत, जे युजरची फसवणूक करुन फोनमध्ये एन्ट्री करतात. रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे, की कोरोनामुळे अनेक युजर्स घरातच आहेत, त्यामुळे त्यांना ट्रॅक केलं गेलं नाही परंतु लॉकडाउन नसतं, तर Stalkerware चा धोका अधिक लोकांना निर्माण झाला असता. काय आहे स्पायवेअर - स्पायवेअर एक असा प्रोग्राम आहे, जो एखाद्या ऑरिजनल प्रोग्रामच्या कॉपीप्रमाणे दिसतो. म्हणजेच एखाद्या अ‍ॅपचं दुसरं नकली बनावट अ‍ॅप. युजर अनेकदा चुकून असं बनावट-नकली अ‍ॅप डाउनलोड करतात. त्यानंतर थर्ड पार्टीकडे युजर्सचे संपूर्ण डिटेल्स कॉल लॉग, मेसेज, लोकेशन आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटीचे सर्व डिटेल्स जातात. याचा फायदा घेत फ्रॉड केले जातात.

  (वाचा - UIDAI ने सांगितला Aadhaar सुरक्षित ठेवण्याचा नवा पर्याय; असा लॉक करा आधार नंबर)

  Wi-Fi - Wi-Fi नावाचं एक फेक अ‍ॅप आहे, ज्याद्वारे Stalkerware प्रोग्राम युजर्सच्या फोनमध्ये एन्ट्री करतं. सायबर स्पेस फर्म kaspersky नुसार, हे अ‍ॅप फोनचं लोकेशन एक्सेस करतं. गेल्या वर्षीही या प्रोग्रामने युजर्सचं नुकसान केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. 2019 मध्ये 67,500 युजर्स आणि 2020 मध्ये 53,870 मोबाईल युजर्स या व्हायरसच्या जाळ्यात अडकले. (वाचा - फोन हरवल्यास किंवा चोरी झाल्यास WhatsApp Account असं करा प्रोटेक्ट) Stalkerware कसं ओळखाल? तुमच्या फोनमध्ये Stalkerware इन्स्टॉल आहे की नाही हे ओळखण्यासाठी तुम्हाला फोनमधून असे सर्व अ‍ॅप डिलीट करावे लागतील, जे वापरात नाही. फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन unknown sources मध्ये जाऊन हे चेक करता येईल. येथे थर्ड पार्टीद्वारे लोड झालेल्या अ‍ॅपची ओळख करता येते. जर यात Stalkerware ही सामिल असेल, तर मोबाईल डेटा ऑफ करुन रिमूव्ह करा. त्यासह Unknown Sources डिसेबल करा.
  Published by:Karishma Bhurke
  First published: