मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Missed call पासून SMS पर्यंत, PF Account Balance जाणून घेण्याच्या 4 सोप्या पद्धती

Missed call पासून SMS पर्यंत, PF Account Balance जाणून घेण्याच्या 4 सोप्या पद्धती

अनेक जण वेळोवेळी आपला PF Account Balance चेक करत असतात. अशात अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही PF Balance तपासू शकता.

अनेक जण वेळोवेळी आपला PF Account Balance चेक करत असतात. अशात अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही PF Balance तपासू शकता.

अनेक जण वेळोवेळी आपला PF Account Balance चेक करत असतात. अशात अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही PF Balance तपासू शकता.

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : प्रोविडेंट फंड किंवा PF सर्व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा भाग आहे. PF रक्कम रिटायरमेंटसाठीची इनव्हेस्टमेंट असून कधीही हा फंड काढता येऊ शकतो. अनेक जण वेळोवेळी आपला PF Account Balance चेक करत असतात. अशात अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही PF Balance तपासू शकता.

SMS द्वारे चेक करा PF बॅलेन्स -

जर तुमच्या UAN नंबरसह KYC डिटेल्स अपडेट असतील, तर तुम्हाला एका Text Message द्वारे पीएफ बॅलेन्स चेक करू शकता.

सर्वात आधी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन 7738299899 वर EPFOHO UAN ENG टाइप करा. इंग्रजीमध्ये जाणून घेण्यासाठी ENG वापरता येईल. हिंदीमध्ये जाणून घेण्यासाठी EPFOHO UAN HIN टाइप करुन SMS पाठवा.

त्यानंतर काही वेळात PF Account Balance बाबत मेसेज येईल.

विना Internet ही करता येईल UPI Payment, पाहा काय आहे सोपी पद्धत

Missed Call द्वारे चेक करा पीएफ बॅलेन्स -

SMS शिवाय रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन Missed call द्वारेही पीएफ बॅलेन्स समजू शकतो. EPFO मध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन 011-22901406 यावर मिस्ड कॉल करा. मिस्ड कॉल केल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर बॅलेन्सची माहिती मिळेल.

EPFO वेबसाइट -

EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जा. इथे Services सेक्शनमध्ये For Employees पर्यायावर क्लिक करा. आता Member Passbook वर क्लिक करा आणि UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.

View Passbook सेक्शनमध्ये क्लिक करुन बॅलेन्स तपासू शकता.

Umang App -

Umang app भारत सरकारचं App असून यावर अनेक सुविधांची माहिती मिळते. पीएफ बॅलेन्स तपासण्यासाठी Umang App ओपन करा आणि EPFO पर्यायावर क्लिक करा. इथे employee-centric services वर क्लिक करा. आता view passbook पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर UAN आणि OTP टाका. त्यानंतर PF Balance समजू शकेल.

First published:

Tags: Open ppf account, PF Amount, PF Withdrawal