• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • विना Internet ही करता येईल UPI Payment, पाहा काय आहे सोपी पद्धत

विना Internet ही करता येईल UPI Payment, पाहा काय आहे सोपी पद्धत

UPI पेमेंट विना इंटरनेटही करता येऊ शकतं. यासाठी तुमचा नंबर BHIM App वर UPI ट्रान्झेक्शनसाठी रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतरच याचा वापर करता येऊ शकतो.

  • Share this:
    नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : UPI अर्थात Unified Payments Interface चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डिजीटल ट्रान्झेक्शनसाठी UPI डिझाइन करण्यात आलं आहे. याद्वारे पैसे सेंड तसंच रिसिव्हही करता येतात. महत्त्वाची बाब म्हणजे UPI पेमेंट विना इंटरनेटही करता येऊ शकतं. यासाठी तुमचा नंबर BHIM App वर UPI ट्रान्झेक्शनसाठी रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतरच याचा वापर करता येऊ शकतो. BHIM App वर UPI ट्रान्झेक्शनसाठी रजिस्टर्ड नंबरवरुनच विना इंटरनेट UPI पेमेंट करता येतं. UPI Payment करताना इंटरनेट नसल्यास, नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI ची *99# ही सुविधा फायद्याची ठरेल. *99# NPCI ची USSD वर आधारित मोबाईल बँकिंग सर्विस आहे. ही सर्विस नोव्हेंबर 2012 मध्ये लाँच करण्यात आली होती. सुरुवातीला ही सर्विस केवळ BSNL आणि MTNL युजर्ससाठीच उपलब्ध होती.

    आता Mobile Data संपला तरी नो टेन्शन, विना Internet असं वापरता येईल WhatsApp

    सर्वात आधी फोनचा डायल पॅड ओपन करा आणि *99# टाइप करुन कॉलवर टॅप करा. इथे एक नवी विंडो दिसेल, ज्यात 7 ऑप्शन्स असतील. Send Money, Receive Money, Check Balance, My Profile, Pending Requests, Transactions आणि UPI PIN असे ऑप्शन्स असतील.

    तुमच्या Debit Card चा PIN कसा कराल सेट? वाचा सोपी प्रोसेस

    केवळ पैसे पाठवायचे असल्यास, डायल पॅडवर 1 नंबर दाबून Send Money पर्याय निवडा. त्यानंतर फोन नंबर, UPI ID किंवा अकाउंट नंबर आणि IFSC कोडचा वापर करुन पैसे पाठवा. त्यानंतर अमाउंट लिहून ट्रान्झेक्शन पूर्ण करण्यासाठी 4 ते 6 अंकी UPI PIN एंटर करा. त्यानंतर Send वर टॅप करा.
    Published by:Karishma
    First published: