नवी दिल्ली, 30 मार्च : पेमेंट अॅप मोबिक्विक (Mobikwik) युजर्सचा डेटा डार्क वेबवर विकला जात आहे, असा दावा सिक्योरिटी रिसर्चरने केला आहे. तब्बल 3.5 मिलियन युजर्सचा डेटा विकला जात असून यात युजर्सची खासगी माहिती सामिल असल्याचं रिसर्चरने सांगितलं आहे. 3.5 मिलियन युजर्सचा जो डेटा लिक झाला आहे, त्यात KYC ची माहिती, पत्ता, फोन नंबर, आधार कार्ड डिटेल्स आणि इतर महत्त्वाची माहिती विकली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. अनेक युजर्सला त्यांची वैयक्तिक माहिती इंटरनेटवर व्हायरल होत असल्याची जाणीव झाली आहे. सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी डेटा ब्रीच सर्वात आधी फेब्रुवारीमध्ये पाहिला होता. 1 कोटी भारतीय कार्डधारकांचा वैयक्तिक डेटा आणि केवायसी ज्यात पॅन नंबर, आधार कार्डचा समावेश असलेल्या सॉफ्ट कॉपी कंपनीच्या डेटा सर्व्हरवरुन भारतातून लीक झाल्याचं सांगितलं जात आहे. यात 6 टीबी केवायसी डेटा आणि 350 जीबी mysql डंप सामिल आहे. डेटा ब्रीचचा स्क्रिनशॉट ट्विटरवर सुरक्षा रिसर्चर इलियट एल्डरसनने पोस्ट केला होता. त्या ट्विटमध्ये त्यांनी ‘इतिहासातील सर्वात मोठा केवायसी डेटा लीक’ असं म्हटलं होतं.
(वाचा - देशात प्रत्येक तिसरं DL बनावट; तुमचं Driving Licence खरं की खोटं? असं ओळखा )
TechNadu रिपोर्टनुसार, ईमेल आयडी, फोन नंबर, पासवर्ड अॅप्लिकेशन इन्स्टॉल, फोन निर्माता, आयपी, जीपीएस आणि इतर माहिती लीक झाली आहे. कंपनीने फेब्रुवारीमध्ये राजशेखर यांचा दावा फेटाळला होता. परंतु सोमवारी डार्क वेबवरुन एक लिंक कथितरित्या ऑनलाईन पाहण्यात आली. वापरकर्त्यांनी त्यांची पर्सनल माहिती डार्क वेबवर पाहिल्याचा दावा केला आहे. काही युजर्सनी Mobikwik च्या डेटाचे स्क्रिनशॉटही पोस्ट केले आहेत, जे डार्क वेबवर विक्रीसाठी होते.
(वाचा - Video: उन्हाळ्याच्या दिवसात वापरा AC Helmet, बायकर्ससाठी खास गॅजेट, किंमतही कमी )
रिपोर्ट्सनुसार, डेटा 1.5 बिटकॉइन जवळपास 86000 डॉलरमध्ये विकला जात असल्याची माहिती आहे. परंतु मोबिक्विकने राजहरिया यांचा दावा फेटाळला आहे. कंपनीच्या एका प्रवक्ताने, आम्ही कसून तपास केला असून आमच्या युजर्सचा डेटा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.