Home /News /technology /

Online Fraud टाळण्यासाठी या सोप्या गोष्टी लक्षात ठेवाच, Online Payment वेळी नाही होणार फसवणूक

Online Fraud टाळण्यासाठी या सोप्या गोष्टी लक्षात ठेवाच, Online Payment वेळी नाही होणार फसवणूक

ऑनलाइन बँकिंग व्यवहार करताना कोणती काळजी घ्यायची, काय धोके आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

नवी दिल्ली, 17 जानेवारी : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक व्यवसायांचं स्वरूप बदललं आहे. अनेक कंपन्यांचं काम ऑनलाइनच सुरू झालं आहे. अगदी स्थानिक व्यापारी, किराणा दुकानं यांनीही डिजिटल अर्थव्यवस्था (Digital Financial System) स्वीकारल्याचं प्रमाण वाढलं आहे. ऑनलाइन व्यवहारांसाठी डिजिटल माध्यमांचा वापरही वाढला आहे. या डिजिटल अर्थप्रणालीचे जसे काही फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. डिजिटल प्रणालीचा वापर वाढल्यानंतर ऑनलाइन फ्रॉड (Online Fraud) म्हणजेच फसवणुकीचे गुन्हेही वाढले आहेत. फक्त संस्थाच नव्हेत, तर अनेक व्यक्तीही या ऑनलाइन फसवणुकीच्या शिकार झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन बँकिंग व्यवहार करताना कोणती काळजी घ्यायची, काय धोके आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. ऑनलाइन व्यवहार करताना खालील गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही इन्स्टॉल केलेल्या ॲपबद्दल माहिती घ्या - तुमच्या डिव्हाइसवर ॲप डाउनलोड (App Download) किंवा इन्स्टॉल (App Install) करताना खबरदारी घ्या. अगदी हे ॲप्स आर्थिक व्यवहारांशी निगडित नसतील तरीही त्याबद्दल जागरूक राहा. ही ॲप्स अधिकृत आणि विश्वासार्ह कंपन्या किंवा व्यवसायांकडूनच तयार केलेली असावीत. ‘तुमच्या मोबाइल प्लॅटफॉर्मच्या ॲप स्टोअरमध्ये (गुगल प्ले स्टोअर, विंडोज ॲप स्टोअर, iPhone ॲप स्टोअर, इ. ) उपलब्ध असलेली बँकिंग किंवा शॉपिंग ॲप्सच डाउनलोड करावीत आणि वापरावीत,’ असं BankBazaar.com चे मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO) मुरारी श्रीधरन यांचं म्हणणं आहे. तुमच्या खात्यातून घेतलेल्या माहितीचा त्यांच्याकडून काहीही गैरवापर होणार नाही याची खात्री करून घ्या.

हे वाचा - मॅट्रिमोनियल साइटवरील इंजिनिअर निघाला भामटा; पुण्यातील महिलेला 62 लाखांचा गंडा

सार्वजनिक नेटवर्कचा वापर टाळा - आर्थिक व्यवहार करताना पब्लिक म्हणजेच सार्वजनिक नेटवर्क (Avoid Using Public Network) वापरणं टाळा. हॉटेल्स, एअरपोर्ट किंवा अशा सार्वजनिक ठिकाणचे हॉटस्पॉट किंवा वाय फायवरून कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन आर्थिक व्यवहार करू नका. सार्वजनिक नेटवर्क्स ओपन म्हणजेच खुली नेटवर्क्स असतात. त्यामुळे त्यांच्यामधून माहिती म्हणजे डेटा सहजपणे चोरीला जाऊ शकतो. त्यातलं एन्क्रिप्शन म्हणजेच सुरक्षा हॅकर्स अगदी सहजपणे तोडू शकतात. त्याद्वारे कोणत्याही फोनमधून ते सहजपणे महत्त्वाची माहिती मिळवू शकतात. त्यामुळे तुमचं डिव्हाइस पासवर्ड असलेल्या वैयक्तिक इंटरनेट कनेक्शनशी जोडलं गेलेलं असेल, तेव्हाच आर्थिक व्यवहार करणं सुरक्षित असल्याचा सल्ला दिला जातो.

हे वाचा - Vishing Fraud: एका फोन कॉलने खाली होऊ शकतं बँक अकाउंट,या गोष्टी लक्षात ठेवाच

लिंक्सबद्दल जागरूक राहा - कोणत्याही लिंक्सच्या आमिषाला बळी पडू नका. अनेक वेबसाइट्स, मेसेजेस किंवा ई-मेल्समधून तुम्हाला लिंक्स पाठवल्या जातात. या लिंक्सद्वारे तुम्हाला आकर्षक रकमेची बक्षिसं मिळतील अशी आमिषंही दाखवली जातात, मात्र अशा बहुतेकशा लिंक्स बनावट असतात. या लिंक्स अनेकदा बनावट साइट्सशी जोडलेल्या असतात. त्याद्वारे तुमच्या मोबाइलचं सुरक्षा कवच सहजपणे तोडलं जातं आणि त्याद्वारे व्यक्तीची आर्थिक आणि वैयक्तिक माहिती चोरता येऊ शकते. खरं तर ऑनलाइन आर्थिक व्यवहार हे आपल्या सोयीसाठी आहेत, पण वेळीच योग्य ती काळजी घेतली नाही तर त्यामुळे खूप मोठं नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या मोबाइलमध्ये तुमची सर्व माहिती सुरक्षित आहे ना याची वेळोवेळी खात्री करून घ्या.
First published:

Tags: Cyber crime, Online fraud, Online payments, Tech news

पुढील बातम्या