मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Online Fraud : QR Code ने Payment करताना सावध व्हा, एक चूक आणि रिकामं होईल बँक अकाउंट

Online Fraud : QR Code ने Payment करताना सावध व्हा, एक चूक आणि रिकामं होईल बँक अकाउंट

तुम्ही क्यूआर कोडचा (QR Code) वापर करत असाल, तर पेमेंट करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

तुम्ही क्यूआर कोडचा (QR Code) वापर करत असाल, तर पेमेंट करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

तुम्ही क्यूआर कोडचा (QR Code) वापर करत असाल, तर पेमेंट करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी : देशात डिजीटल पेमेंटमध्ये (Digital Payment) मोठी वाढ झाली आहे. ऑनलाइन पेमेंट (Online Payment) करणं जितकं सोपं, सोयीचं आणि वेगवान झालं आहे, तितकंच ऑनलाइन फ्रॉड (Online Fraud), सायबर क्राइमच्या प्रकरणात वाढ झाली आहे. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही क्यूआर कोडचा (QR Code) वापर करत असाल, तर पेमेंट करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

क्विक रिस्पॉन्स कोड अर्थात QR Code दिसताना Square Barcode प्रमाणे दिसतो. हा सर्वात आधी जपानमध्ये बनवण्यात आला होता. QR Code ने पेमेंट करताना एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, की स्कॅन केल्यानंतर क्यूआर कोड तुम्हाला केवळ तुमच्या पेमेंट्स अॅपवरच रिडायरेक्ट करेल. जर इतर कुठे रिडायरेक्ट होत असेल तर सतर्क राहण्याची गरज आहे.

- QR Code स्कॅन केल्यानंतर तुम्हाला एखादं App डाउनलोड करण्यासाठीच्या लिंकवर नेलं जात असेल, तर लगेच पेमेंट थांबवा. जे App डाउनलोड करण्यासाठी सांगितलं जात आहे, त्यामुळे तुमच्या बँक अकाउंटला धोका निर्माण होतो. अनेकदा हॅकर्स ईमेलमध्ये तुमचं पेमेंट फेल झाल्याचं सांगत क्यूआर कोड पाठवतात आणि त्यांनी पाठवलेला कोड स्कॅन (QR Code Scan) करण्यास सांगतात. अशा मेलपासून सावध व्हा. असे कोड चुकूनही स्कॅन करू नका. असं केल्याने मोठं नुकसान होऊ शकतं.

हे वाचा - मुंबईतील तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार;WhatsApp वापरत असाल तर आधी हा VIDEO पाहाच

- कोणीही QR Code वापरुन पैसे रिसिव्ह करण्याचं सांगत असेल, तर सावध व्हा. कारण रक्कम रिसिव्ह करण्यासाठी कधीही क्यूआर कोड स्कॅन केला जात नाही. शॉपिंग मॉल, पेट्रोल पंप किंवा कोणत्याही लहान-मोठ्या दुकानात क्यूआर कोड स्कॅन करत असाल, तर असं पेमेंट सावधपणे, त्याच दुकानासाठी करा.

हे वाचा - Smartphone चोरी झाला?हे आहेत शोधण्यासाठीचे सोपे पर्याय;स्विच ऑफ फोनही होईल ट्रॅक

QR Code मध्ये काय Store होऊ शकतं?

QR Code ‘Image-based hypertext link’ याचा उपयोग ऑफलाइन मोडमध्ये करता येतो. यात कोणत्याही URL ला Encode करता येऊ शकतं. यामुळे जर कोणी QR Code Scan केला, तर Website ओपन करू शकतो. त्यामुळे कोणत्याही लिंकवर आलेला क्यूआर कोड स्कॅन करू नका.

First published:

Tags: Online fraud, Online payments, QR code payment, Tech news