मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google सर्च करताना एका चुकीमुळे हजारोंचा गंडा; जाणून घ्या गुगलवर नंबर सर्च करताना काय काळजी घ्याल

Google सर्च करताना एका चुकीमुळे हजारोंचा गंडा; जाणून घ्या गुगलवर नंबर सर्च करताना काय काळजी घ्याल

गुगल सर्चवर दाखवण्यात आलेल्या नंबरवर कॉल केल्यानंतर त्यांना हजारोंचा गंडा घालण्यात आला. गुगलमध्ये सर्चवेळी झालेल्या चुकीमुळे त्यांच्या बँक अकाउंटमधून 80 हजार रुपये खाली झाले आहेत.

गुगल सर्चवर दाखवण्यात आलेल्या नंबरवर कॉल केल्यानंतर त्यांना हजारोंचा गंडा घालण्यात आला. गुगलमध्ये सर्चवेळी झालेल्या चुकीमुळे त्यांच्या बँक अकाउंटमधून 80 हजार रुपये खाली झाले आहेत.

गुगल सर्चवर दाखवण्यात आलेल्या नंबरवर कॉल केल्यानंतर त्यांना हजारोंचा गंडा घालण्यात आला. गुगलमध्ये सर्चवेळी झालेल्या चुकीमुळे त्यांच्या बँक अकाउंटमधून 80 हजार रुपये खाली झाले आहेत.

नवी दिल्ली, 4 जानेवारी : गुगलवर सर्वच जण काही ना काही सर्च करत असतात. परंतु गुगलवर सर्च (Google Search) दरम्यान, एका चुकीमुळे तुमचं बँक अकाउंट एका मिनिटांत खाली होऊ शकतं. असंच काहीसं दिल्लीत राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडलं आहे. गुगलमध्ये सर्चवेळी झालेल्या चुकीमुळे त्यांच्या बँक अकाउंटमधून 80 हजार रुपये खाली झाले आहेत.

कुरियर कंपनी DTDC कस्टमर केयरचा नंबर सर्च करताना त्यांच्यासोबत फसवणूक झाली आहे. गुगल सर्चवर दाखवण्यात आलेल्या नंबरवर कॉल केल्यानंतर त्यांना हजारोंचा गंडा घालण्यात आला. त्या व्यक्तीने गुगलवर सर्च केलेला नंबर, DTDC कस्टमर केयरचा नंबर डायल केल्यानंतर, फ्रॉड करणाऱ्यांनी त्यांच्याकडून संपूर्ण माहिती एका गुगल शीटवर भरली, त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी चांगल्या सपोर्टसाठी त्या व्यक्तीच्या फोनवर TeamViewer QuickSupport ही लिंक पाठवली.

गुगल डॉक्सवर अ‍ॅड्रेस प्रूफसारखी माहिती मिळवल्यानंतर स्कॅमर्स अर्थात फ्रॉड करणाऱ्यांनी, त्या व्यक्तीला बँक वेरिफिकेशनसाठी दोन रुपयांचं ट्रान्झेक्शन करायला सांगितलं. स्कॅमर्सनी सांगितलं की, ते कुरियर तोपर्यंत डिलिव्हर केलं जाणार नाही, जोपर्यंत बुकिंग अमाउंट पे केली जात नाही. त्यांनी कुरियल डिलिव्हर केल्यानंतर, घेतलेली बुकिंग अमाउंट रिफंड केली जाईल असं सांगितलं. स्कॅमर्सनी त्या व्यक्तीला ट्रान्झेक्शनसाठी डेबिट कार्ड वापरण्यास सांगितलं आणि त्यांच्याकडून कार्डचा सीवीवी नंबर आणि इतर डिटेल्स मागितले.

(वाचा - सर्वात स्वस्त SUV ची सेफ्टी फीचर्समध्ये बाजी; क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 4 स्टार)

TeamViewer QuickSupport च्या मदतीने स्कॅमर्स त्या व्यक्तीचा मोबाईल डिस्प्ले पाहत होते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर एक ओटीपी आला. TeamViewer च्या मदतीने त्यांनी तो ओटीपी पाहिला आणि 40000 रुपये अकाउंटमधून उडवले. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्रान्झेक्शन करत पुन्हा 40000 रुपये अकाउंटमधून उडवले.

ऑनलाईन फसवणूकीचा हा प्रकार DTDC शी जोडलेला आहे. अशाप्रकारे अनेक युजर्स स्वीगी, झोमॅटो, आणि इतर ई-कॉमर्स साईट्सचा कस्टमर केअर नंबर गुगलवर सर्च करतात आणि ऑनलाईन फसवणूक होते.

(वाचा - WhatsApp Pay वर सायबर फ्रॉडपासून सावधान; पेमेंट करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवाच)

अशावेळी गुगल सर्च करताना काय खबरदारी घ्याल -

गुगलवर कस्टमर केअर नंबर सर्च करताना, कोणत्या सर्च पेजवरून नंबर घेऊन त्यावर कॉल करू नका. कंपनीच्या अधिकृत साईटवर जाऊन कस्टमर केअरचा नंबर सर्च करावा. तसंच कस्टमर केअरला कॉल केल्यानंतर बँकिंगशी संबंधित कोणतीही माहिती शेअर करू नये.

First published:
top videos

    Tags: Google