Home /News /technology /

WhatsApp Pay वर सायबर फ्रॉडपासून सावधान; पेमेंट करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवाच

WhatsApp Pay वर सायबर फ्रॉडपासून सावधान; पेमेंट करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवाच

WhatsApp Pay या सुविधेचा वापर करताना सावध राहणं गरजेचं आहे. अन्यथा सायबर फ्रॉडचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. व्हॉट्सअ‍ॅपच्या नावाखाली आलेल्या खोट्या कॉल, मेसेजपासून सावध राहा.

    नवी दिल्ली, 5 जानेवारी : जगभरात WhatsApp सर्वाधिक वापर होणारा मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. व्हॉट्सअ‍ॅपने नुकतीच भारतात आपली पेमेंट सर्व्हिसही सुरू केली. परंतु या सुविधेचा वापर करताना सावध राहणं गरजेचं आहे. अन्यथा सायबर फ्रॉडचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. WhatsApp ने NPCI सोबत करार केला - WhatsApp ने आपल्या या सुविधेसाठी National Payment Corp. of India (NPCI) सोबत करार केला आहे. या करारासह व्हॉट्सअ‍ॅपने भारतात डिजिटल पेमेंट सर्व्हिस Unified Payments Interface (UPI) लाँच केली आहे. सध्या देशात WhatsApp चे 40 कोटी युजर्स आहेत. त्यापैकी जवळपास 2 कोटी लोकांना आपल्या या सुविधेशी जोडण्याची WhatsApp ची योजना आहे. WhatsApp ची ही पेमेंट सुविधा वापरताना काही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. WhatsApp कडून कोणत्याही ट्रान्झेक्शनवर कॉल, मेसेज येत नाही - WhatsApp पेमेंटसाठी कोणताही कॉल, मेसेज येत नाही. जर कोणी व्हॉट्सअ‍ॅपचा प्रतिनिधी बोलत असल्याचं सांगत कॉल केल्यास, त्यावर विश्वास ठेऊ नका. हा फसवणूकीचा प्रकार असू शकतो. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या नावाखाली आलेल्या खोट्या कॉल, मेसेजपासून सावध राहा. WhatsApp Pay चं कोणतंही कस्टमर सर्विस सेंटर नाही - WhatsApp Pay वेळी कोणतीही समस्या आल्यास, WhatsApp कडून कोणतीही मदत मिळत नाही. WhatsApp चं भारतात कोणतंही कस्टमर सर्व्हिस सेंटर नाही. त्यामुळे WhatsApp Pay दरम्यान काही समस्या आल्यास संबंधित बँकेशी संपर्क करावा लागेल. कोणताही व्यक्ती स्वत: ऐजन्सीकडून आल्यास सांगत असल्यास, त्यापासून सावध राहा आणि फसवणूकीच्या जाळ्यात अडकू नका. कोणासोबतही खासगी माहिती शेअर करू नका - WhatsApp वर कोणासोबतही आपला वन टाइम पासवर्ड (OTP)आणि UPI पिन नंबर शेअर करू नका. ओटीपी मागण्यासाठी एखादा कॉल मेसेज आल्यास सावध व्हा. बँकेशी संपर्क करून त्यांना त्वरित याबाबत अलर्ट करा. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका - सायबर फ्रॉड करणारे WhatsApp वर अनेक लिंक शेअर करतात, त्यावर क्लिक केल्यानंतर लाखो रुपये जिंकल्याचं सांगतात. यावर क्लिक केल्यानंतर फोन हॅक होऊ शकतो आणि संपूर्ण माहिती सायबर फ्रॉड करणाऱ्यांपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे कोणत्याही संशयित लिंकवर क्लिक करू नका.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Whatsapp pay

    पुढील बातम्या