Home /News /technology /

सर्वात स्वस्त SUV ची सेफ्टी फीचर्समध्ये बाजी; क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 4 स्टार

सर्वात स्वस्त SUV ची सेफ्टी फीचर्समध्ये बाजी; क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 4 स्टार

या कारने भारतात सर्वात स्वस्त एसयूवीचा किताब जिंकला आहे. कमी किंमतीमुळे कंपनीच्या या कारच्या सेफ्टी फीचर्सवर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र आता सेफ्टी फीचर्समध्ये 4 स्टार मिळवल्यानंतर या कारची मोठी चर्चा आहे.

  नवी दिल्ली, 4 जानेवारी : देशातील सर्वात स्वस्त एसयूव्ही Nissan Magnite ने सेफ्टी फीचर्समध्ये बाजी मारली आहे. Asean NCAP Crash Test मध्ये या कारला 4 स्टार रेटिंग मिळालं आहे. Nissan Magnite कार 2 डिसेंबर रोजी लाँच करण्यात आली होती. या कारने भारतात सर्वात स्वस्त एसयूवीचा किताब जिंकला आहे. कमी किंमतीमुळे कंपनीच्या या कारच्या सेफ्टी फीचर्सवर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र आता सेफ्टी फीचर्समध्ये 4 स्टार मिळवल्यानंतर या कारची मोठी चर्चा आहे. Nissan Magnite वेरिएंट - निसान इंडियाने Nissan Magnite ला XE, XL, XV आणि XV Premium सारखे 4 वेरियंट्स मार्केटमध्ये उतरवले आहेत. यापैकी XE बेस वेरिएंट आणि XV Premium टॉप वेरिएंट आहे. Nissan Magnite ची सुरुवातीची किंमत 5.54 लाख रुपये आहे. परंतु 31 दिसंबर 2020 पर्यंत Nissan Magnite च्या बुकिंगवर सर्व ग्राहकांना कंपनीने, इंट्रोडक्टरी किंमत 4.99 लाख रुपयांत गाडीची डिलिव्हरी दिली आहे. याच्या टॉप वेरिएंटची किंमत 9 लाख 35 हजार रुपये आहे. त्यामुळे ही भारतातील सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे.

  (वाचा - WhatsApp Pay वर सायबर फ्रॉडपासून सावधान; पेमेंट करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवाच)

  Nissan Magnite दोन इंजिन ऑप्शनसह येते. ज्यात 1.0 लीटर 3 सिलेंडर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन 72bhp पॉवर आणि 96Nm टॉर्क जेनरेट करते. तर याच्या कॉम्पॅक्ट एसयूवीचं दुसरं इंजिन 1.0 लीटर 3 सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे, जे 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्समध्ये 99bhp ची पॉवर आणि 160nm चं पिक टॉर्क जेनरेट करतं. याचं CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवालं इंजिन 99bhp पॉवर आणि 152Nm टॉर्क जेनरेट करते. सेफ्टी फीचर्स - Nissan Magnite मध्ये रियर पार्किंग सेंसर, एबीएस, डुअल एयरबॅग्स, ट्रॅक्शन कंट्रोल, रियर पार्किंग सेंसर, हिल असिस्ट आणि स्पीड सेसिंग डोअरसह अनेक सेफ्टी फीचर्स आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Car

  पुढील बातम्या