नवी दिल्ली, 20 जून : सर्वसामान्यपणे अनेक गोष्टी ऑनलाईन झाल्याने, वस्तूही मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी केल्या जातात, त्यामुळे मोठी सुविधा झाली आहे. पण दुसरीकडे मात्र सायबर फ्रॉड प्रकरणातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सतर्क राहणं अतिशय गरजेचं आहे. सायबर फ्रॉडमुळे आर्थिक नुकसान होण्याचा धोका निर्माण होतो. यात फिशिंग ई-मेलचीही (Phishing Email) मोठी भूमिका असते. फिशिंग ईमेल एक फ्रॉड ई-मेल मेसेज आहे. फिशिंग मेल अगदी खऱ्या मेलप्रमाणे दिसतात. त्यामुळे असे मेल एखाद्या कंपनीनेच पाठवले आहेत असंच वाटू शकतं.
अनेकांच्या मेल बॉक्समध्ये फिशिंग ई-मेल येत असतात. यापासून सावध राहणं अतिशय गरजेचं आहे. अशा फिशिंग ई-मेलमध्ये तुमच्याकडून खासगी फायनेंशियल माहिती उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जाते. एकदा अशा ई-मेलवर तुमची माहिती गेल्यास, फ्रॉड करणारे आर्थिक किंवा इतर त्रास देऊ शकतात. अशा फिशिंग ई-मेलपासून सावध राहण्याची गरज आहे.
फिशिंग ईमेजची ओळख कशी कराल?
फिशिंग ई-मेलची ओळख करणं अतिशय गरजेचं आहे. फिशिंग ई-मेल चुकीच्या पद्धतीने लिहिलेले असतात. त्यात व्याकरणाच्या चुका, चुकीच्या स्पेलिंग आणि इतर काही चुका आढळतील.
फिशिंग स्कॅमर्स अनेकदा कंपन्यांचे मिळते-जुळते लोगो तयार करतात, जे स्पष्ट नसतात. असे ईमेल नेहमी एका लिंकशी जोडलेले असतात, जेणेकरुन तुम्ही त्यावर क्लिक करावं. त्यामुळे कोणत्याही ईमेलवर, मेसेजवर आलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
बनावट ईमेलमध्ये खऱ्या कंपनीचे URL मॅच करत नाहीत. एखाद्या लिंकवर क्लिक झालं, तरी त्यावर कोणतीही माहिती शेअर करू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.