नवी दिल्ली, 22 मार्च : भारतात लवकरच One Plus 10 Pro लॉंच होण्याची शक्यता आहे. कारण कंपनीनं ट्विटरवर (Twitter) या फोनचं प्रमोशन सुरू केलं आहे. कंपनी टिझर सीरिजच्या माध्यमातून वनप्लस 10 प्रो (OnePlus 10 Pro) फोन प्रमोट करत असून, यात प्रामुख्यानं फोनचे फीचर्स हायलाईट केले जात आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला वनप्लस कंपनीनं चीनमध्ये (China) वन प्लस 10 प्रो आणि वनप्लस 10 हे स्मार्टफोन लॉंच केले होते. कंपनीच्या वेबसाईटनुसार, भारतात वनप्लस 10 प्रोचं लॉंचिंग काही दिवसांत होईल. या फोनची लॉंचिंगची निश्चित तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, वनप्लस कंपनीनं या फोनचा टिझर लाँच केल्याने, तो लवकरच लॉंच होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या महिन्याच्या अखेरीस हा फोन लॉंच होऊ शकतो, असं मीडिया रिपोर्ट्सवरून दिसून येतं.
वनप्लस 10 प्रोमध्ये हॅसलब्लॅड कॅमेरा (Hasselblad Camera) असल्याचं टीझरमध्ये दिसत आहे. हॅसलब्लॅड ट्यून कॅमेरा देणारी वनप्लस 9 ही पहिली आणि अपग्रेड सीरिज ठरली होती. वनप्लस 10 प्रो हा फोन व्होल्कॅनिक ब्लॅक आणि एमरॉल्ड फॉरेस्ट या दोन रंगांमध्ये उपलब्ध होईल, असं देखील टिझरमधून स्पष्ट होत आहे.
भारतात वनप्लस 10 प्रोची प्रामुख्यानं स्पर्धा Samsung Galaxy S22 Ultra, iQOO 9 Pro आणि iphone 13 या स्मार्टफोनशी असेल. वनप्लस 10 प्रो या फोनमध्ये 9Gen1 प्रोसेसर असेल, त्यामुळे वनप्लस कंपनीचा हा फोन सर्वात पॉवरफुल ठरेल.
वनप्लस 10 प्रो मध्ये 2k रिझोल्युशन आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लाससह 6.7 इंची LTPO 2.0 AMOLED डिस्प्ले असेल. या फोनमध्ये 120hzरिफ्रेश रेट सपोर्ट मिळेल. या फोनमध्ये 12GB RAM आणि 512GB इंटरनल स्टोरेज (Internal Storage) असेल.
A billion stories to tell, a billion colours to capture.
This Holi, get ready to celebrate the colours of life like never before with the new #OnePlus10Pro5G co-developed with Hasselblad. Capture it all. Capture it right. Stay tuned! #ShotonOnePlus10Pro pic.twitter.com/CGwvJuDuS0 — OnePlus India (@OnePlus_IN) March 18, 2022
वनप्लस 10 प्रोमध्ये 48 मेगापिक्सल, 50 मेगापिक्सल आणि एक 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा (Telephoto Camera) असेल. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा पंच होल कॅमेरा देण्यात येईल. या फोनमध्ये 80w फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 50w फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्ट असलेली 5000mAhची बॅटरी येईल.
The long-awaited Lab series of OnePlus 10 Pro Edition is now open for applications. 🎉 Get our latest flagship device before everyone else and test it for the community.
— OnePlus India (@OnePlus_IN) March 21, 2022
अशी असेल किंमत -
चीनमध्ये वनप्लस 10 प्रोची किंमत भारतीय रुपयानुसार सुमारे 56,200 रुपयांपासून आहे. मागील वर्षी वनप्लस कंपनीने वनप्लस 9 प्रो हा फोन 64,999 रुपयांच्या किमतीत लॉंच केला होता. याच अंदाजनुसार वनप्लस 10 प्रोची किंमत सुमारे 60,000 रुपये असू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Oneplus, Smartphone, Tech news