मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google वर फक्त हे तीन शब्द लिहा, लगेच समजेल तुमचा Internet Speed; सोपी-सिक्योर पद्धत

Google वर फक्त हे तीन शब्द लिहा, लगेच समजेल तुमचा Internet Speed; सोपी-सिक्योर पद्धत

Google ने स्पीड टेस्टसाठी मेजरमेंट लॅबसह (एम-लॅब) पार्टनरशिप केली आहे. या टेस्टमुळे तुमच्या कनेक्शनच्या स्पीडच्या आधारे 40MB हून अधिक डेटा ट्रान्सफर होऊ शकतो.

Google ने स्पीड टेस्टसाठी मेजरमेंट लॅबसह (एम-लॅब) पार्टनरशिप केली आहे. या टेस्टमुळे तुमच्या कनेक्शनच्या स्पीडच्या आधारे 40MB हून अधिक डेटा ट्रान्सफर होऊ शकतो.

Google ने स्पीड टेस्टसाठी मेजरमेंट लॅबसह (एम-लॅब) पार्टनरशिप केली आहे. या टेस्टमुळे तुमच्या कनेक्शनच्या स्पीडच्या आधारे 40MB हून अधिक डेटा ट्रान्सफर होऊ शकतो.

नवी दिल्ली, 22 मार्च : ज्यावेळी इंटरनेट इनेक्शनमध्ये (Internet connection) चढ-उतार होतात त्यावेळी सर्वात आधी स्पीड टेस्ट (Internet Speed Test) घेतली जाते. इंटरनेट स्पीड टेस्ट त्यावेळी तुमच्या डिव्हाइसला मिळणारा डाउनलोड आणि अपलोड स्पीड दाखवतो. अनेक App, वेबसाइट्सही अशा टेस्टिंग करण्यासाठी मदत करतात. Google ची एक वेबसाइट सर्वात सोपी यापैकी एक आहे.

Google ने स्पीड टेस्टसाठी मेजरमेंट लॅबसह (एम-लॅब) पार्टनरशिप केली आहे. या टेस्टमुळे तुमच्या कनेक्शनच्या स्पीडच्या आधारे 40MB हून अधिक डेटा ट्रान्सफर होऊ शकतो. यासाठी मोबाइल डेटा शुल्क लागू शकतं. तुम्ही M-लॅबशी जोडले राहाल आणि तुमची आयपी अॅड्रेस (IP Address) त्यांच्यासह शेअर केला जाईल. प्रायव्हसी पॉलिसीनुसार तो त्यांच्याकडून प्रोसेस केला जाईल.

हे वाचा - Chromeयुजर्ससाठी सरकारकडून हाय रिस्क अलर्ट,वापरत असाल तर लगेच करा महत्त्वाचं काम

Google वर कसं कराल स्पीड टेस्ट -

- तुमच्या स्मार्टफोन, PC किंवा टॅबलेटवर कोणत्याही इंटरनेट ब्राउजरवर Google.com ओपन करा.

- सर्च बारचा वापर करुन रन स्पीड टेस्ट (Run Speed Test) सर्च करा.

- सर्च रिझल्टमध्ये एक इंटरनेट स्पीड टेस्ट डायलॉग बॉक्स दिसेल. डॉयलॉग बॉक्समध्ये '30 सेकंदाहून कमी वेळेत तुमच्या इंटरनेटचा स्पीड तपासा' असं लिहिलेलं येतं. सर्वसाधारणापणे 40MB हून कमी डेटा ट्रान्सफर होतो. परंतु इंटरनेट स्पीड चांगला असल्यास अधिक डेटा ट्रान्सफर होतो.

- बॉक्सच्या खाली असलेल्या रन स्पीड टेस्ट बटणावर क्लिक करा.

- क्लिक केल्यानंतर एक पॉप-अप येईल. यात Google रिझल्ट दाखवेल.

हे वाचा - स्मार्टफोन, टीव्ही आणि लॅपटॉपचे दर वाढणार; पाहा काय आहे कारण

- महत्त्वाची बाब म्हणजे M-लॅब टेस्टिंग करतं आणि इंटरनेट रिसर्चला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व टेस्ट रिझल्ट सार्वजनिक रुपात प्रकाशित केले जातात.

दरम्यान, तुम्ही Google Chrome वापरत असाल महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे. IT मंत्रालयाअंतर्गत भारतीय कंप्यूटर इमरजेन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) Google Chrome Browser साठी अलर्ट जारी केला आहे. Google Chrome मध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. फसवणुकीपासून वाचण्यासाठी CERT-In ने गुगल क्रोम युजर्सला Google Chrome नव्या 99.0.4844.74 वर्जनमध्ये अपडेट करण्याचं सांगितलं आहे. हे वर्जन नुकतंच रोल आउट केलं गेलं असून यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Google, High speed internet, Internet use, Tech news