Home /News /technology /

खूशखबर! Jio दिवाळीआधी ग्राहकांना देणार मोठं गिफ्ट; लाँच होणार जगातील सर्वात स्वस्त Smartphone

खूशखबर! Jio दिवाळीआधी ग्राहकांना देणार मोठं गिफ्ट; लाँच होणार जगातील सर्वात स्वस्त Smartphone

जिओ आपला हा स्मार्टफोन लाँच करण्याबरोबरच त्याची किंमत (JioPhone Next Price) आणि उपलब्धतेबद्दल माहिती जाहीर करणार आहे.

    नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर: सध्या स्मार्टफोनची मोठ्या प्रमाणात चलती आहे. प्रत्येक घरात किमान एक तरी स्मार्टफोन (Smartphones) असतोच. काही घरांमध्ये तर व्यक्तीगणिक स्मार्टफोन आहेत. मात्र, तरी देखील भारतात असं कितीतरी गरीब नागरिक आहेत ज्यांना स्मार्टफोन खरेदी करणं परवडत नाही. अशा ग्राहकांसाठी रिलायन्स जिओनं (Jio Smartphone) एक स्मार्टफोन बाजारात आणण्याची योजना तयार केली आहे. जिओफोन नेक्स्ट (JioPhone Next) असं या स्मार्टफोनचं नाव असून त्याच्या लाँचिंगची तारीख जाहीर झाली आहे. दिवाळीच्या दिवशी हा स्मार्टफोन लाँच केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 4 नोव्हेंबर 2021 ला जिओ आपला हा स्मार्टफोन लाँच करण्याबरोबरच त्याची किंमत (Jio Phone Next Price) आणि उपलब्धतेबद्दल माहिती जाहीर करणार आहे. सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन जिओनं या वर्षी (2021) आयोजित केलेल्या 44 व्या अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये (AGM) जिओफोन नेक्स्ट (JioPhone Next) या आपल्या नवीन स्मार्टफोनचं अनावरण केलं होतं. जिओनं गुगल (Google) आणि क्वालकॉमच्या (Qualcomm) सहकार्यानं या फोनची निर्मिती केली आहे. त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा कमी किमतीचा 4 जी स्मार्टफोन असणार आहे. यापूर्वी 10 सप्टेंबरला हा स्मार्टफोन बाजारात लाँच होणार होता. परंतु, काही कारणास्तव कंपनीनं लाँचिंग पुढे ढकललं होतं. 'या' किमतीत मिळू शकतो जिओफोन नेक्स्ट जिओफोन नेक्स्टच्या किमतीबाबत कंपनीनं अगोदरच स्पष्टीकरण दिलेलं आहे की, तो सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन असेल. या स्मार्टफोनची किंमत पाच हजार रुपयांपेक्षा कमी असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कंपनीनं अधिकृत माहिती सांगितलेली नाही. जिओफोन नेस्क्टमध्ये असू शकतात 'ही' स्पेसिफिकेशन्स हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या कस्टमाइज्ड व्हर्जनवर आधारित असणार आहे. ही बाब कंपनीनं सर्वात अगोदरच स्पष्ट केलेली आहे. फोनमध्ये ऑटोमॅटिक रीड-अलाउड ऑफ स्क्रीन टेक्स्ट, ट्रान्सलेशन, गुगल असिस्टंट, स्मार्ट कॅमेरा आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी सारखे खास फिचर्स मिळतील. जिओ फोन असल्यामुळं या स्मार्टफोनमध्ये जिओ टीव्ही (JioTV), माय जिओ (MyJio), जिओ सावन (Jio Saavn) यासारखी जिओ अॅप्स प्री-लोडेड असणार आहेत. असंही म्हटले जात आहे की, या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 (Qualcomm Snapdragon 215) प्रोसेसर असू शकतो. 13मेगा पिक्सेल सिंगल रियर कॅमेरा आणि 8 मेगा पिक्सेल फ्रंट कॅमेरा असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅमसह 32 GB इंटरनल स्टोरेजची सुविधा मिळू शकते. गुगल (Google ) आणि क्वालकॉम (Qualcomm) सारख्या दिग्गज टेक कंपन्यांच्या सहकार्यानं हा स्मार्टफोन तयार करण्यात आलेला आहे. वरिल सर्व फिचर्ससह पाच हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये जर हा फोन उपलब्ध होणार असेल तर ही विशेष बाब असेल हे नक्की.
    First published:

    Tags: Reliance Jio, Smartphones

    पुढील बातम्या