नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : आज 15 सप्टेंबरपासून Ola Electric Scooter ची विक्री सुरू झाली आहे. ज्या ग्राहकांनी Ola Scooter साठी Pre-booking केलं होतं, ते बाकी पेमेंट करुन आता गाडी खरेदी करू शकतात. Ola CEO भाविष अग्रावाल यांनी ट्विटरवर विक्री सुरू झाल्याची माहिती दिली आहे. कंपनी मागील आठवड्यात विक्री सुरू करणार होती, परंतु वेबसाईटमध्ये काही तांत्रिक समस्या आल्याने ही विक्री पुढे ढकलण्यात आली होती. Ola Electric Scooter ऑनलाईन खरेदी करण्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर जावं लागेल. कंपनीने आपली ई-स्कूटर दोन वेरिएंटमध्ये लाँच केली आहे. ज्यात एक Ola S1 आणि दुसरं Ola S1 Pro आहे. Ola ई-स्कूटरचं S1 वेरिएंट बेसिक असून याची किंमत 99,999 रुपये आहे. तर S1 Pro कंपनीचं टॉप मॉडेल वेरिएंट असून याची किंमत 1,29,999 रुपये आहे. त्याशिवाय जर EMI वर स्कूटर खरेदी करायची असल्यास, कंपनीने त्यासाठीही पर्याय दिला आहे. स्कूटर खरेदी करण्यासाठी फायनान्सची गरज असल्यास, ओला फायनेंशियल सर्विसेजने S1 स्कूटरला फायनान्स करण्यासाठी, मदतीसाठी IDFC Bank, HDFC Bank, TATA Capital सह प्रमुख बँकांसह करार केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक स्कूटरच्या अॅडव्हान्स वर्जन S1 Pro साठी EMI 3199 रुपयांपासून सुरू होणार आहे. HDFC बँक ओला आणि ओला इलेक्ट्रिक अॅपवर ग्राहकांना काही मिनिटांत Pre-Approved Auto Loan (प्री-अप्रूव्ड ऑटो लोन) उपलब्ध करुन देईल.
OLA e-scooter: या 4 चार राज्यात सबसिडी अंतर्गत स्वस्तात मिळणार स्कूटर, पाहा किती कमी होईल किंमत
The revolution is live!
— Ola Electric (@OlaElectric) September 15, 2021
Purchase opens in order of reservation, if you reserved early you're at the front of the line for purchase & delivery! We’ll notify you as soon as your slot opens via email!
Bring home the revolution, buy now! Exclusively on the Ola App! #JoinTheRevolution pic.twitter.com/Cj7jwBz0M7
फायनान्सची गरज नसल्यास, Ola S1 साठी 20000 रुपये आणि Ola S1 Pro साठी 25000 रुपये अॅडव्हान्स पेमेंट करू शकता. इतर रक्कम स्कूटर इनवॉईस दरम्यान द्यावी लागेल. यासाठी डिलीव्हरी ऑक्टोबर 2021 पासून सुरू होणार आहे.