नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : बाजारात लवकरच ओला इलेक्ट्रिक स्कूटर (Ola Electric Scooter) धमाकेदार एन्ट्री करणार असून या स्कूटरमध्ये रिवर्स मोड (Reverse Mode) हे भन्नाट फीचर देण्यात आलं आहे. कंपनीने या फीचरबाबत एक ट्विटही केलं आहे. कंपनीचे CEO भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर ओला ई-स्कूटर रिवर्स गिअरमध्ये चालवण्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. Ola Electric ने दिलेल्या माहितीनुसार, ओला स्कूटर वेगात रिवर्स करता येते. ओला इलेक्ट्रिकची नवी स्कूटर काही अशा फीचर्ससह आली आहे, ज्यात सेगमेंट फर्स्ट किंवा सेगमेंट बेस्ट असण्याचा दावा केला आहे. नवी स्कूटर कीलेस एक्सपिरियंससह आहे. म्हणजेच ही स्कूटर विना चावी, स्मार्टफोनवर एका अॅप्लिकेशनच्या मदतीने स्टार्ट केली जाऊ शकेल. तसंच ओला स्कूटर 499 रुपयांत रिजर्व्हही करता येते. Ola ची Electric Scooter 15 ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे. या दरम्यान कंपनी स्कूटरच्या किंमतीसह स्कूटरच्या दुसऱ्या डिलीव्हरी टाईम-फ्रेमचाही खुलासा करेल. तसंच लाँच दिवशी स्कूटरच्या ड्रायव्हिंग रेंजचा अधिकृतरित्या खुलासा होईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, स्कूटरमध्ये फास्ट-चार्जिंग कॅपेबिलिटी मिळेल, जी स्कूटरला 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज करू शकते. 50 टक्के चार्जमध्ये 75 किलोमीटर रेंज मिळू शकण्याचा दावा कंपनीने केला आहे.
सातत्याने गाडीत AC सुरू असल्यास मायलेजवर होतो परिणाम? अशापद्धतीने करा वापर
You can reverse the Ola Scooter at an unbelievable pace, you can also reserve the Ola Scooter at an unbelievable price of ₹499 now! ⁰😎
— Ola Electric (@OlaElectric) August 7, 2021
See you on 15th August 🛵#JoinTheRevolution at https://t.co/5SIc3JyPqm pic.twitter.com/trTJLJBapM
OLA भारतात उभारणार जगातला सर्वात मोठा ई-स्कूटर कारखाना; 10 हजार लोकांना मिळणार रोजगार
ओला इलेक्ट्रिक स्कूटरचं बुकिंह सुरू असून इच्छूक ग्राहक स्कूटर बुक करण्यासाठी 499 रुपयांची टोकन अमाउंट देऊ शकतात. 24 तासांत 1 लाखहून अधिक बुकिंग झाल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला होता.