नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : Ola Electric स्कूटरची विक्री 8 सप्टेंबर 2021 पासून सुरू होणार होती. परंतु आता Ola Electric ची विक्री पुढे ढकलण्यात आली आहे. 8 सप्टेंबर रोजी तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण दिवस स्कूटरची विक्री होऊ शकली नाही. आता कंपनीने याची विक्री पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलली आहे.
Ola Electric स्कूटरच्या S1 आणि S1 Pro ची ऑनलाईन विक्री आता 15 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. ओलाचे अध्यक्ष आणि ग्रुप सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरद्वारे ग्राहकांना ही माहिती दिली आहे. ग्राहकांना विक्री पुढे ढकलण्याचं कारण स्पष्ट करताना त्यांनी ओला स्कूटरची ऑनलाईन विक्री सुरू न केल्याबद्दल ग्राहकांची माफीही मागितली आहे.
'आम्ही आजपासून आमच्या Ola S1 स्कूटर खरेदीसाठी सुरू करण्याचं सांगितलं होतं. परंतु वेबसाईट आमच्या अपेक्षानुसार नसल्याने दुर्देवाने खरेदीसाठी वेबसाईटला अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक तास प्रतिक्षा करावी लागली असल्याने सर्वांची माफी मागतो.'
My message on the @OlaElectric purchase issues today. pic.twitter.com/vDVfwLqC7U
— Bhavish Aggarwal (@bhash) September 8, 2021
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, S1 वेरिएंटची किंमत 99,999 रुपये इतकी आहे. तर S1 Pro ची किंमत 1,29,999 रुपये आहे. या दोन्ही किमती एक्स शोरुम आहेत. त्याशिवाय जर EMI वर स्कूटर खरेदी करायची असल्यास, कंपनीने त्यासाठीही पर्याय दिला आहे.
भारतात ओला इलेक्ट्रिक स्कूटरसाठी कंपनी 400 शहरांत 100000 हून अधिक लोकेशन किंवा टचपॉईंट्सवर हायपर चार्जर लावेल. कोणकोणत्या शहरात चार्जिंग पॉईंट्स आहेत, याची माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.