मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /OLA e-scooter: या 4 चार राज्यात सबसिडी अंतर्गत स्वस्तात मिळणार स्कूटर, पाहा किती कमी होईल किंमत

OLA e-scooter: या 4 चार राज्यात सबसिडी अंतर्गत स्वस्तात मिळणार स्कूटर, पाहा किती कमी होईल किंमत

Ola ई-स्कूटरचं S1 वेरिएंट बेसिक असून याची किंमत 99,999 रुपये आहे. तर S1 Pro कंपनीचं टॉप मॉडेल वेरिएंट असून याची किंमत 1,29,999 रुपये आहे.

Ola ई-स्कूटरचं S1 वेरिएंट बेसिक असून याची किंमत 99,999 रुपये आहे. तर S1 Pro कंपनीचं टॉप मॉडेल वेरिएंट असून याची किंमत 1,29,999 रुपये आहे.

Ola ई-स्कूटरचं S1 वेरिएंट बेसिक असून याची किंमत 99,999 रुपये आहे. तर S1 Pro कंपनीचं टॉप मॉडेल वेरिएंट असून याची किंमत 1,29,999 रुपये आहे.

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : Ola ने (OLA e-scooter) आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) 15 ऑगस्ट रोजी भारतात लाँच केली. कंपनीने पहिल्यांदा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पाउल ठेवलं असून, जबरदस्त मॉडेल भारतीय बाजारात लाँच केलं आहे. कंपनीने आपली ई-स्कूटर दोन वेरिएंटमध्ये लाँच केली आहे. ज्यात एक S1 आणि दुसरं S1 Pro आहे. Ola ई-स्कूटरचं S1 वेरिएंट बेसिक असून याची किंमत 99,999 रुपये आहे. तर S1 Pro कंपनीचं टॉप मॉडेल वेरिएंट असून याची किंमत 1,29,999 रुपये आहे.

जर तुम्ही OLA e-scooter खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी असून एका गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल, की यावर 20000 रुपयांपर्यंत सबसिडीचा फायदा घेता येऊ शकतो. हा फायदा FAME-2 स्कीम आणि स्टेट सबसिडी अंतर्गत घेता येऊ शकतो.

केंद्र सरकारशिवाय देशातील चार राज्य इलेक्ट्रिक वाहनावर आणखी वेगळी सबसिडी देत आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान राज्यातील लोकांना सबसिडीचा फायदा मिळू शकतो.

OLA ची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात; अवघ्या 499 करु शकता बूक, वाचा फिचर्स

दिल्ली -

Ola S1 - 85,099

Ola S1 Pro - 1,10,149

महाराष्ट्र -

Ola S1 - 94,999

Ola S1 Pro - 1,24,999

गुजरात -

Ola S1 - 79,999

Ola S1 Pro - 1,09,999

राजस्थान -

Ola S1 - 89,968

Ola S1 Pro - 1,29,999

सरकारकडून या स्कीममध्ये बदल, Electric टू व्हिलर्सच्या किमतीत कपातीमागे हे आहे कारण

हे चार राज्य सोडून देशातील इतर राज्यात Ola e-scooter च्या दोन्ही वेरिएंटच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे चार राज्य वगळता इतर राज्यात Ola च्या S1 मॉडेलची किंमत 99,999 रुपये आणि Ola च्या S1 Pro मॉडेलची किंमत 1,29,999 रुपये असेल. या किमती एक्स-शोरुम किमती असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

ही ई-स्कूटर सिंगल चार्जमध्ये 150 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे Ola e-Scooter होम चार्जरसह लाँच करण्यात आली आहे. म्हणजेच स्कूटर घरातील नॉर्मल सॉकेटमधूनही चार्ज करता येऊ शकते. Ola e-Scooter 18 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसंच याला फास्ट चार्जिंग सपोर्टही देण्यात आला आहे. यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीचीही सुविधा आहे.

First published:
top videos

    Tags: Electric vehicles