मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Job Alert! वर्षाअखेरीस 500 लोकांना नोकरी देणार ही Tech Company

Job Alert! वर्षाअखेरीस 500 लोकांना नोकरी देणार ही Tech Company

एसबीआयच्या अहवालानुसार यंदा `अशी` असेल जॉब मार्केटची स्थिती

एसबीआयच्या अहवालानुसार यंदा `अशी` असेल जॉब मार्केटची स्थिती

न्यूक्लियसने सॉफ्टवेअर कंपनीने डिसेंबर 2021 पर्यंत भारतात मेट्रो शहरं वगळता इतर शहरांमधून 500 नवे तरुण इंजिनियर्सची भरती करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

नवी दिल्ली, 9 जुलै: कोरोना काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. देशात कोरोनाची स्थिती काहीशी सुधारत असताना आता एका टेक्नोलॉजी कंपनीने जॉब व्हॅकेन्सी सुरू केल्या आहेत. कर्ज आणि बँकिंग सोल्यूशन देणाऱ्या न्यूक्लियस सॉफ्टवेअर कंपनीने वर्षाअखेरीस 500 इंजिनियर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. न्यूक्लियसने सॉफ्टवेअर कंपनीने डिसेंबर 2021 पर्यंत भारतात मेट्रो शहरं वगळता इतर शहरांमधून 500 नवे तरुण इंजिनियर्सची भरती करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

न्यूक्लियस सॉफ्टवेअर एनएससीमध्ये जवळपास 2000 लोक कार्यरत आहेत. दरवर्षी 200 ते 250 कँपस निवड केली जाते. कंपनीची शैक्षणिक संस्थांशी 50 हून अधिक भागीदारी आहे. यावर्षी आणखी 20 महाविद्यालयं यात जोडली जाणार आहेत.

(वाचा - मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचूनही UPSCचं मायाजाल झुगारलं;गाव गाठलं अन् बनला कोट्यधीश)

कंपनीचा तरुणांकडे कल -

तरुण ग्रॅज्युएट्सला न्यूक्लियस स्कूल ऑफ बँकिंग टेक्नोलॉजीद्वारा (NSBT) ग्लोबल फायनेंशियल सेक्टरसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर तयार करण्यासाठी 6 ते 12 आठवडे ट्रेनिंग दिलं जाईल. न्यूक्लियस सॉफ्टवेअर 50 हून अधिक देशांमधील 200 हून अधिक वित्तीय संस्था, कर्ज, कॉर्पोरेट बँकिंग, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, ऑटोमोटिव्ह फायनान्स आणि अन्य व्यवसाय क्षेत्रांना सहाय्य करते.

(वाचा - Job Alert: या कंपनीकडून केली जाणार 5000 पदांची भरती; फ्रेशर्सना मोठी संधी)

न्यूक्लियस सॉफ्टवेअरचे व्यवस्थापकीय संचालक विष्णू दुसाद यांनी सांगितलं, की छोट्या शहरातील इंजिनियर्सकडे खूप काही आहे. परंतु त्यांची क्षमता पाहिली जात कारण अधिकतर कॉर्पोरेट छोट्या कॉलेजमध्ये काम घेत नाही. अशा परिस्थितीत आम्ही तरुणांवर विश्वास दाखवतो. आम्ही भारतातील तरुण इंजिनियर्सला एक चांगली पातळी गाठण्यासाठीच नव्हे,तर योग्यरित्या प्रगती करण्याची संधी देत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे.

First published:
top videos

    Tags: Job, Job alert, Tech news