• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Job Alert: या कंपनीकडून केली जाणार 5000 पदांची भरती; फ्रेशर्सना आणि तरुणींना आहे सुवर्णसंधी

Job Alert: या कंपनीकडून केली जाणार 5000 पदांची भरती; फ्रेशर्सना आणि तरुणींना आहे सुवर्णसंधी

रिटेल ज्वेलरी सेल्स, स्टोअर ऑपरेशन्स, IT, डिजिटल मार्केटिंग आणि अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये या Vacancies आहेत. यापैकी निम्म्या पदांवर महिला उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 8 जुलै : केरळ (Kerala) येथील मलाबार गोल्ड आणि डायमंडसने (Malabar Golds And Diamonds) रिटेल्स ऑपरेशन्ससाठी देशात सुमारे 5000 पदांची भरती (Vacancies) करण्याची घोषणा मंगळवारी केली. ही पदे प्रामुख्याने रिटेल ज्वेलरी सेल्स, स्टोअर ऑपरेशन्स आणि अकाउंटची असतील. यापैकी निम्म्या पदांवर महिला उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. फ्रेश बीटेक/एमबीए उमेदवारांना ज्वेलरी रिटेल सेल्स आणि ऑपरेशन्स या कामाचा अनुभव मिळावा यासाठी इंटर्नशीप (Internship) आणि ट्रेनीशीपचाही (Traineeship) पर्याय देण्यात आला आहे, असे ओरिसा पोस्टच्या वृत्तात म्हटलं आहे. याबाबत मलाबार गोल्डने दिलेल्या निवेदनानुसार, ही पदभरती प्रामुख्याने डिझाईन अण्ड डेव्हलपमेंट, डिजीटल मार्केटिंग, ज्वेलरी उत्पादन, सप्लाय चेन मॅनेजमेंट, मर्चंटडायझिंग, प्रोजेक्ट एक्जिक्युशन, फायनान्स अॅण्ड अकाउंटस, बिझनेस अॅनालिक्टस आणि आयटी या विभागांमध्ये केली जाणार आहे. ही पदभरती प्रामुख्याने कंपनीचे कोझिकोड येथील मुख्यालय आणि बेंगळुरु, चेन्नई, हैद्राबाद, मुंबई आणि कोलकता या विभागीय कार्यालयांव्यतरिक्त अन्य ठिकाणी केली जाईल. ISRO मध्ये ॲप्रेंटिसशिप करण्याची संधी; 22 जुलैपर्यंत करू शकता अर्ज याबाबत मलाबार गोल्डचे अध्यक्ष एम.पी. अहमद यांनी सांगितले की शोरुमची संख्या आणि उलाढाल या दोन्हीबाबत मलाबार गोल्ड हा जगातील आघाडीचा ज्वेलरी रिटेल ब्रॅण्ड (Jewellery Retail Brand) म्हणून ओळखला जावा हा या पदभऱती मागील दृष्टीकोन आहे. एक जबाबदार व्यावसायिक म्हणून आम्हाला सामाजिक कर्तव्याची जाणीव आहे. याच दृष्टीकोनातून 5000 पदांची भरती मोहिम आम्ही सुरु केली आहे. कंपनी आपल्या विस्तार योजनांबाबद खूप उत्साही असून देशातील प्रतिभावान आणि कुशल व्यक्तींना मलाबार कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी या पदभरती मोहिमेच्या माध्यमातून आवाहन करीत आहे. समान संधी या धोरणानुसार रोजगार देण्याची कंपनीची भूमिका असून यासाठी रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या महिलांना सेल्स, गेस्ट रिलेशनशीप आणि ऑपरेशन्स या पदांसाठी प्राधान्याने संधी देण्यात येणार आहे. प्रशिक्षण आणि विकास वृध्दीगंत व्हावा आणि करिअरमध्ये प्रगती साधता यासाठी देखील योजनांची आखणी सुरु असून, या माध्यमातून सेल्स एक्झिक्युटिव्हला सक्षम वेळेच्या चौकटीत रिजन हेडची जबाबदारी मिळू शकते, असे कंपनीने स्पष्ट केले. या पदांसाठी इच्छूक उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरुन अर्ज करावा. मलाबार गोल्ड केरळ व्यतिरिक्त तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये विस्तारण्यासाठी अधिक भर देत आहे. मलाबार गोल्डने यापूर्वीच चेन्नई, लखनौ, हैद्राबाद, मुंबई, पुणे आणि बेंगळुरु या मोठ्या शहरांमध्ये तसेच ईलुरु, सोलापूर आणि अहमदनगर या लहान शहरांमध्ये केंद्रीय स्पर्धात्मक दराने रिटेल मार्केटमध्ये (Retail Market) आपले स्थान निर्माण केले आहे. वर्षभरात स्टार्टअप कंपनीची 100 कोटींची कमाई; तुम्हीही करू शकता हा Online व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तराचा विचार करता, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इजिप्त आणि अन्य आफ्रिकन राज्यांमध्ये विस्तार करण्याची मलाबार गोल्डची योजना असल्याचे अहमद यांनी सांगितले. मलाबार गोल्डची 10 देशांमध्ये 260 रिटेल आऊटलेटस असून 14 होलसेल विभाग, डिझाईन सेंटर्स आणि फॅक्टरीज या देशभरासह मध्य-पूर्व, फार ईस्ट आणि युएसएमध्ये विस्तारल्या आहेत. 4.51 अब्ज डॉलरच्या वार्षिक उलाढालीसह कंपनी जागतिक ज्वेलरी रिटेलर्समधील सर्वात मोठी कंपनी म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे.
First published: