कोल्हापूर, 09 जुलै: स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळल्यानं गेल्या आठवड्यात स्वप्निल लोणकर नावाच्या एका होतकरू विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला होता. या घटनेनंतर राज्य सरकारला जाग आली आणि एमपीएससीच्या परीक्षा घेण्याची घोषणा केली. स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर स्पर्धा परीक्षाबाबत राज्यातील वातावरण तापलं आहे. स्पर्धा परीक्षांबाबत सरकारचं धोरण आणि नाकर्तेपणामुळं अनेक विद्यार्थ्यांना अपयशानं गाठलं आहे. ज्यामुळे ते आणखी नैराश्याच्या गर्तेत जात आहे. तरही ते दिवस रात्र आभ्यास करत अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत आहेत.
पण स्पर्धा परीक्षा सोडून इतर क्षेत्रातही चांगला पैसा आणि यश मिळवता येतं, याचा दाखला कोल्हापूरातील एका विद्यार्थ्यानं दिला आहे. चार वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, एक वेळा यूपीएससीची मुख्य परीक्षा आणि चार वेळा एमपीएससीची मुख्य परीक्षा पास होऊनही अपयश हाती आलेल्या विद्यार्थ्यानं स्पर्धा परीक्षेला रामराम ठोकत स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरू केला आहे. संबंधित विद्यार्थ्याचं नाव शेखर भगवंत लोंढे असून तो सध्या महिन्याला एक कोटी रुपये कमवत आहे. स्पर्धा परीक्षाच सर्वस्व नाही, हे त्यानं सिद्ध केलं आहे.
हेही वाचा-UPSC टॉपर अक्षत जैन यांनी दुसऱ्या प्रयत्नात मिळवलं यश; अशी होती Study Strategy
सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, शेखर हा सांगरूळनजीक असणाऱ्या करवीर येथील रहिवासी आहे. त्यानं 2012 साली शिवाजी विद्यापीठातून (shivaji university) एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यानं ‘यूपीएससी’ची तयारी करण्यासाठी पुणे गाठलं. त्यानं पहिल्याच प्रयत्नात मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली. राज्यसेवेचीही परीक्षा ही दिली. चार वर्षे विविध परीक्षा दिल्या; पण एक दोन मार्कांनी त्याला यशानं नेहमी हुलकावणी दिली. वडील मुख्याध्यापक असूनही स्वःखर्चासाठी पैसे मागण्याची त्याला लाज वाटू लागली. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव उद्भवल्यानं तो गावी गेला आणि स्पर्धा परीक्षेला कायमचा रामराम ठोकला.
हेही वाचा-नक्षलग्रस्त जिल्ह्यात राहून IASहोण्याचं स्वप्न बघणाऱ्या नम्रता जैन यांची यशोगाथा
स्पर्धा परीक्षानंतर काय करायचं हा प्रश्न त्याच्यासमोर होता. यानंतर त्यानं गावकडे बंद पडलेली राईस मील पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. योग्य मार्केटींग स्ट्राटेजी आणि आधुनिकीकरणाचा अवलंब करत त्यानं राईस मील सुरू केली. या राईस मीलमध्ये शेखर कर्नाटकावरून भात आणतो. त्या भाताचं ग्रेडिंग, पॉलिश, फिनिशिंग ची प्रक्रिया मीलमध्ये करतो.
हेही वाचा-Success Story: लोणार ते लंडन! गावाकडच्या मुलाला प्रतिष्ठित Chevening शिष्यवृत्ती
शेखर, सध्या दरमहा 800 टन भातावर अशाप्रकारे प्रक्रिया करतो. 'मदर गोल्ड' नावाचा भाताचा ब्रॅंन्ड त्यानं बाजारात आणला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून शेखर दरमहा 1 कोटी रुपयांची उलाढाल करतो. स्पर्धा परीक्षेत आलेल्या अपयशानं खचून न जाता, त्यानं अन्य मार्गाचा अवलंब करत यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा म्हणजेच सर्वस्व असतं, हा दृष्टीकोन त्यानं मोडीत काढला आहे. त्याच्या या उत्तुंग यशाचं अनेकजण कौतुक करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.