Home /News /technology /

कार चालकांसाठी मोठी बातमी; 1 एप्रिलपासून हे फीचर नसल्यास येईल समस्या, जाणून घ्या सरकारचा नवा नियम

कार चालकांसाठी मोठी बातमी; 1 एप्रिलपासून हे फीचर नसल्यास येईल समस्या, जाणून घ्या सरकारचा नवा नियम

1 एप्रिल 2021 आणि त्यानंतर बनलेल्या कारमध्ये दोन फ्रंट एयरबॅग आवश्यक असणार आहे. नोटिफिकेशननुसार, सध्याच्या मॉडेलसाठी नवा नियम 31 ऑगस्टपासून लागू केला जाईल.

  नवी दिल्ली, 6 मार्च : गाडी चालवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार कारमध्ये फ्रंट एयरबॅग अनिवार्य (Airbag mandatory) करणार आहे. आता 1 एप्रिलपासून प्रत्येक गाडीमध्ये ड्रायव्हरसह को-पॅसेंजर साईडलाही एयरबॅग देणं अनिवार्य असणार आहे. रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने याबाबत कायदा मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला होता, त्याला मंजूरी देण्यात आली आहे. गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेचा विचार करता सरकारने हा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्रालयाने कायदा मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला होता, ज्याला कायदा मंत्रालयाने, परिवहन मंत्रालयाच्या प्रस्तावाला संमती दिली आहे. 31 ऑगस्टपर्यंत अनिवार्य होणार एयरबॅग - मीडिया रिपोर्टनुसार, पुढील तीन दिवसांत यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात येईल. 1 एप्रिल 2021 आणि त्यानंतर बनलेल्या कारमध्ये दोन फ्रंट एयरबॅग आवश्यक असणार आहे. नोटिफिकेशननुसार, सध्याच्या मॉडेलसाठी नवा नियम 31 ऑगस्टपासून लागू केला जाईल. प्रस्तावित अंतिम मुदत जून 2021 होती, जी आता वाढवण्यात आली आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये सरकारने पुढच्या वर्षापासून सर्व कारमधील फ्रंट पॅसेंजरससाठी एयरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावावर सूचना मागितल्या होत्या. नोटिफिकेशननुसार, एयरबॅग्स AIS 145 Bureau of Indian Standards act, 2016  अंतर्गत बनले जातील.

  (वाचा - Google Chrome ब्राउझरला आता आणखी कडक सिक्योरिटी; युजर्सला असा होणार फायदा)

  गेल्या काही वर्षांपासून सरकार कार ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित करण्याच्या दिशेने काम करत आहे. याचाच परिणाम म्हणजे आधीच्या तुलनेत आता कारमध्ये अधिक सेफ्टी फीचर्स देण्यात येतात, जे कार चालवणाऱ्यासह, इतर प्रवाशांसाठीही महत्त्वाचे आहेत. त्यासाठी सरकार आग्रही असून आता या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Airbag, Car, Money, Safety laws, Tech news

  पुढील बातम्या