नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : आजच्या घडीला आधार नंबर सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे. पण आता आपल्याला आधार कार्डची (aadhaar card) हार्ड कॉपी कायम आपल्यासोबत ठेवण्याची गरज नाही. UIDAI ने m aadhaar अॅप सादर केलं आहे. त्यामुळे आपण मोबाइलच्या माध्यमातून सर्व कामं करू शकतो. या अॅपमध्ये 35 सेवा दिल्या जातात. UIDAI ने ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे.
UIDAI ने ट्विटमध्ये लिहिलं आहे की आपल्या स्मार्टफोनवर 35 हून अधिक आधार सेवा मिळवू शकता. डाउनलोड ई-आधार, अपडेट स्टेटस, आधार केंद्राचा पत्ता आदी गोष्टी तुम्ही सहज पाहू शकता.
Get more than 35 Aadhaar services like download eAadhaar, update status, locate Aadhaar Kendra etc. on your smartphone. Download the #mAadhaarApp from:https://t.co/62MEOf8J3P (Android)https://t.co/GkwPFzM9eq (iOS) pic.twitter.com/wTei36WCpw
— Aadhaar (@UIDAI) February 8, 2021
mAadhaar अॅप अँड्रॉइड युझर्स या लिंकवर क्लिक करून आणि अॅपल युझर्स या लिंकवरून डाऊनलोड करू शकतात.
काय काय सुविधा आहेत?
या अॅपमध्ये युझरला रिप्रिंट ऑर्डर, पत्ता बदलणं, ऑफलाइन ई-केवायसी (e-KYC) डाउनलोड, स्कॅन क्यूआर कोड, व्हेरिफाय आधार, व्हेरिफाय ई-मेल, रिट्राइव्ह यूआयडी, अॅड्रेस व्हॅलिडेशन रिक्वेस्ट यांसारख्या सुविधा मिळतात. त्याशिवाय आधार लॉकिंग, बायोमेट्रिक लॉकिंग/अनलॉकिंग, टीओटीपी जनरेशन, प्रोफाइल अपडेट, क्यूआर कोड शेअरिंग या सेवा यात मिळतात.
हे वाचा - इंटरनेट वापरात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर; रिपोर्टमधून महत्त्वाची बाब समोर
तुम्हाला सोयीचं व्हावं म्हणून ई-आधार कार्ड डाउनलोड करता येऊ शकतं. ई-आधार कार्डची पीडीएफ फाइल उघडण्यासाठी युझरला आठ डिजिटच्या पासवर्डची आवश्यकता असते. पासवर्ड दिल्याशिवाय फाइल उघडता येत नाही.
डिटेल्स लॉक करता येतात
एम-आधारच्या माध्यमातून युझरला आधार नंबर हवा ते लॉक किंवा अनलॉक करता येऊ शकतो. आधारशी आपली वैयक्तिक माहिती जोडलेली असते. त्यामुळे त्याची सुरक्षितता महत्त्वाची असते. अॅपमध्ये एकदा बायोमेट्रिक लॉकिंग सिस्टीम (Biometric Locking System) एनेबल केली, तर जोपर्यंत तुम्ही ते अनलॉक करत नाही तोपर्यंत ते वापरता येत नाही.
हे वाचा - प्रायव्हेसीची चिंता सोडा; आता येतंय Android चं नेक्स्ट व्हर्जन
या अॅपमध्ये 12 वेगवेगळ्या भाषांमध्ये (Languages) सुविधा मिळतात. त्यात हिंदी, इंग्रजी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम्, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू, उर्दू या भाषांचा त्यात समावेश आहे. अॅड डाउनलोड केल्यानंतर आपल्याला भाषेबद्दल विचारलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.