नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : शहरांसह आता ग्रामीण भागातही इंटरनेट वापराचं प्रमाण वाढतं आहे. गावांमध्ये बिहारच्या गावांमध्ये सर्वाधिक इंटरनेट (Internet) युजर्स असल्याची बाब समोर आली आहे. तर शहरांमध्ये सर्वाधिक इंटरनेट युजर्स दिल्लीमध्ये आहेत. दिल्ली (Delhi) देशाची राजधानी आहे. व्यवसायाच्या दृष्टीनेही दिल्ली एक मोठं हब आहे. इंडियन टेलिकॉम सर्व्हिस (Telecom Service) इंडिकेटरच्या रिपोर्टनुसार, हा खुलासा झाला आहे.
30 सप्टेंबर 2020 च्या परिस्थितीनुसार हा रिपोर्ट 21 जानेवारी 2021 ला जारी करण्यात आला. रिपोर्टनुसार, देशातील शहरी भागात 474.11 तर गावांमध्ये 302.35 मिलियन इंटरनेट युजर्स आहेत.
इंडियन टेलिकॉम सर्व्हिस (Telecom Service) इंडिकेटरच्या रिपोर्टमध्ये असा खुलासा झाला की, देशभरातील ग्रामीण भागांचा विचार केला तर, सर्वाधिक 32.83 मिलियन इंटरनेट युजर्स एकट्या बिहारच्या गावांमध्ये राहतात. दुसऱ्या क्रमांकावर यूपी पूर्व 30.52 मिलियन इंटरनेट यूजर्ससह आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर महराष्ट्र 26.86 मिलियन युजर्ससह आहे. मध्यप्रदेशात 20.84 मिलियन इंटरनेट युजर्स आहेत आणि राजस्थानमध्ये 20.49 मिलियन युजर्सची संख्या आहे.
रिपोर्टनुसार, शहरी भागात 41.08 मिलियन इंटरनेट युजर्ससह दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. शहरी भागानुसार 39.86 मिलियन इंटरनेट युजर्ससह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर तमिलनाडूमध्ये 38.43 मिलियन युजर्स आहेत. शहरी भागातील कॅटेगरीमध्ये यूपी ईस्ट मध्ये 26.36 मिलियन, यूपी वेस्ट मध्ये 24.14 मिलियन, राजस्थान 22.86 मिलियन आणि मध्य प्रदेशात 30.48 मिलियन इंटरनेट युजर्स आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.