नवी दिल्ली, 7 मे : इंटरनेटच्या काळात आपण अनेक Apps आणि सर्विसेजचा वापर करतो. यावेळी लॉग-इन करण्यासाठी पासवर्डची गरज असते. पासवर्डमुळे आपलं अकाउंट सुरक्षित ठेवण्यास मदत होते. पण इतक्या साऱ्या अकाउंट्सचे इतके सारे पासवर्ड्स लक्षात ठेवणं सर्वात कंटाळवाणी बाब ठरते. पण आता एका लेटेस्ट अपडेटनुसार गुगल
(Google), अॅपल
(Apple) आणि मायक्रोसॉफ्टचे
(Microsoft) अनेक अकाउंट्स आणि सर्विस विना पासवर्ड्सचे लॉग-इन करता येईल.
जगातील तीन प्रमुख टेक कंपन्या गुगल (Google), अॅपल (Apple) आणि मायक्रोसॉफ्टने (Microsoft) एकत्रित एक घोषणा केली आहे. आता एक असं फीचर अपडेट येईल, ज्यात युजर्स विना पासवर्ड, कोणत्याही पासवर्डशिवाय आपल्या अकाउंटमध्ये लॉग-इन आणि इतर सर्विसेज अॅक्सेस करू शकतील. कंपनीने केलेल्या या नव्या घोषणेबाबत आनेक युजर्सने आनंद व्यक्त केला आहे.
गुगल (Google), अॅपल (Apple) आणि मायक्रोसॉफ्टचा (Microsoft) हा नवा बदल प्रत्येक डिव्हाइस आणि ऑपरेटिंग सिस्टम युजर वापर करू शकेल. या पासवर्डलेस ऑथेंटिकेशनचा फायदा अँड्रॉइड, iOS, क्रोम-ओएस, क्रोम ब्राउजर, एज, सफारी आणि मॅक-ओएस सारख्या अनेक प्लॅटफॉर्मचे युजर्स घेऊ शकतात. हे नवं फीचर तुम्ही आपल्या स्मार्टफोन, डेस्कटॉप आणि ब्राउजर डिव्हाइसेज प्रत्येक ठिकाणी वापरू शकता.
कसं करेल काम?
एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, टेक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की विना पासवर्ड युजर्स आपल्या अकाउंट्समध्ये इतकं सहजपणे लॉग-इन करू शकतील, जितकं ते आपला फोन अनलॉक करतात. त्याप्रमाणे तुम्ही तुमचे ऑनलाइन अकाउंट्सही लॉग-इन करू शकता.
गुगल (Google), अॅपल (Apple) आणि मायक्रोसॉफ्टचा (Microsoft) अकाउंटमध्ये लॉग-इन करण्यासाठी एक खास क्रिप्टोग्राफिक टोकन
(Cryptographic Token) किंवा एक FIDO
(Fast ID Online) क्रेडेंशियलचा वापर करावा लागेल. अशाप्रकारे विना पासवर्ड अकाउंटमध्ये लॉग-इन करता येईल.
या फीचरमुळे पासवर्ड्स लक्षात ठेवण्यापासून सुटका होईल. तसंच हॅकर्ससाठीही अशा प्रकारचे लॉग-इन आणि अकाउंट्स हॅक करणंही अतिशय कठीण होईल. यामुळे ऑनलाइन फ्रॉडचा धोकाही कमी होण्यास मदत होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.