Home /News /technology /

Social Media वर अन-सोशल होण्याची गरज? मानसिक, शारीरिक आरोग्यावर असा होतोय परिणाम

Social Media वर अन-सोशल होण्याची गरज? मानसिक, शारीरिक आरोग्यावर असा होतोय परिणाम

कित्येक तास सोशल मीडिया वापरण्याचा गंभीर परिणाम (Social Media side effects) लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर दिसून येत आहेत.

नवी दिल्ली, 7 मे : आज अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबत मोबाईल आणि इंटरनेट हीदेखील जणू मूलभूत गरजच झाली आहे. माणूस एकवेळ दिवसभर उपाशी राहू शकेल, मात्र दिवसभर मोबाईलशिवाय राहणं कठीण जात आहे. मोबाईलवरही आपण पूर्णवेळ ठराविक सोशल मीडिया अ‍ॅप्सवर (Social Media apps) वेळ घालवतो. हे सगळं वाचायला अतिशयोक्ती वाटत असेल, मात्र ग्लोबल स्टॅटिस्टिकच्या एका आकडेवारीनुसार भारतीय व्यक्ती या दिवसभरात सात तासांहून अधिक वेळ आपल्या मोबाईलवर स्क्रोल करण्यात व्यग्र (Indians spend 7 hours a day on mobile) असतात. यातील अडीच तासांहून अधिक काळ ते सोशल मीडियावर असतात. या सगळ्याचे गंभीर परिणाम (Social Media side effects) लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर दिसून येत आहेत. फेक न्यूजचं जंजाळ सोशल मीडियावरील चुकीची माहिती आपल्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा (Social Media cons) साठवत आहे. फेसबुकवर दर महिन्याला सुमारे चार ते पाच कोटी फेक न्यूज (Fake news) पोस्ट केल्या जातात. तर ट्विटरवर दर महिन्याला 15 ते 20 लाख अकाऊंट्स केवळ फेक न्यूज पोस्ट आणि शेअर करण्याचे काम करतात. जगभरातील सर्व सोशल मीडिया यूजर्सपैकी भारतीय या फेक न्यूजला (Indians and Fake news) सर्वाधिक बळी पडत आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीने केलेल्या एका सर्व्हेनुसार, सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या एकूण भारतीयांपैकी 64 टक्के यूजर्स दररोज कमीत कमी एक (Fake news in India) तरी फेक न्यूज वाचतातच. तर, जगभरातील एकूण सोशल मीडिया यूजर्सपैकी 57 टक्के लोक दररोज एक तरी खोटी किंवा चुकीची बातमी वाचतात. शारीरिक व्याधींमध्येही वाढ कित्येक तास सोशल मीडिया वापरण्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होत आहे. ऑस्ट्रेलियातील एका विद्यापीठाने केलेल्या सर्व्हेनुसार, केवळ 20 मिनिटं ट्विटर सर्फिंग केल्याने एखाद्या व्यक्तीचा मूड (Social Media affecting mood) बदलू शकतो. तर अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील बफेलो युनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार, सोशल मीडियावर दररोज सहा तासांहून अधिक वेळ घालवणाऱ्या व्यक्तींमध्ये डायबेटिस, हायपरटेन्शन आणि डिप्रेशन अशा व्याधी (Social media affecting health) होण्याची शक्यता अधिक असते. झी न्यूजने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. राजकारणातही मोठा प्रभाव सोशल मीडियाचा केवळ आपल्या वैयक्तिक नाही, तर सामाजिक जीवनावरही परिणाम होतो आहे. आजच्या काळात सोशल मीडिया एक अशी शक्तिमान (Social Media power in politics) गोष्ट झाली आहे, जी कोणालाही सत्तेत आणू शकते किंवा पायउतार करण्यास भाग पाडू शकते. प्यू रिसर्चने केलेल्या एका अभ्यासानुसार, अमेरिकेत 2016 साली झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत 68 टक्के मतदारांनी सोशल मीडियावरुन प्रभावित होत आपला निर्णय घेतला होता. तर आयक्युब्स या संस्थेने फेब्रुवारीमध्ये भारतात केलेल्या सर्व्हेनुसार, 61 टक्के मतदार सोशल मीडिया पोस्ट्स पाहूनच कोणाला मत द्यायचे याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट झाले. एकूणच, चुकीची माहिती पसरवण्याचं आणि त्याद्वारे लोकांवर प्रभाव पडण्याचं प्रमाण पाहता सोशल मीडिया हा आपल्या सामाजिक आयुष्यासाठीही मोठ्या प्रमाणात घातक ठरत आहे.

हे वाचा - काय आहे Digital Detox? तुमच्या आयुष्यावर असा होतो परिणाम, या गोष्टी लक्षात ठेवाच

जरा अन-सोशल व्हा सोशल मीडियापासून होणारे नुकसान टाळायचं असेल, तर आपल्याला जरा अन-सोशल होण्याची गरज आहे. तुम्हाला मिळालेली कोणतीही बातमी वा माहिती व्हेरिफाईड सोर्सकडून (Verified Sources) आली आहे की अनव्हेरिफाईड हे आधी तपासा. कोणतीही बातमी पुढे शेअर करण्यापूर्वी ती योग्य आहे याची खात्री (Precaution while using Social Media) करा. व्हॉट्सअपवर आलेली माहिती खरी आहे असं न मानता, खात्रीशीर सूत्रांकडून त्याची पडताळणी करा. तसंच, सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सोशल मीडियाऐवजी खऱ्या आयुष्यात सोशल राहण्याचा प्रयत्न करा. असं केल्यास, सोशल मीडियामुळे तुमचं होणारं नुकसान टाळण्यास मदत होईल.
First published:

Tags: Health, Side effects, Social media, Tech news

पुढील बातम्या