जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आता WhatsApp वर बुक करता येणार Uber, पाहा काय आहे प्रोसेस

आता WhatsApp वर बुक करता येणार Uber, पाहा काय आहे प्रोसेस

नोटिफिकेशनवर क्लिक करुन App ओपन करू नका.

नोटिफिकेशनवर क्लिक करुन App ओपन करू नका.

भारतात Uber ग्राहक लवकरच WhatsApp चा वापर करुन कॅब राइड बुक करू शकणार आहेत. उबरने नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 4 डिसेंबर : भारतात Uber ग्राहक लवकरच WhatsApp चा वापर करुन कॅब राइड बुक करू शकणार आहेत. उबरने नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. उबरने दिलेल्या माहितीनुसार मेटाच्या (आधीचं फेसबुक) लोकप्रिय मेसेजिंग App WhatsApp सह कंपनीचं इंटिग्रेशन ग्लोबल लेवलवर होईल. या आठवड्यापासून एक नवी सर्विस सुरू करणार असल्याची घोषणा उबरने केली. युजर्सला उबर WhatsApp चॅटबॉटच्या माध्यमातून उबर राइड बुक करण्याचा पर्याय देईल. उबर मागील आठ वर्षांपासून भारतात काम करत असून 70 शहरांत उपलब्ध आहे. आता भारतीयांना लवकरच App ओपन न करताच कॅब बुक करण्याचं फीचरही मिळेल. सध्या ही सुविधा पायलट बेसवर लखनऊमध्ये सुरू करण्यात येत आहे. लवकरच ही सुविधा भारतातील इतर शहरांत उपलब्ध केली जाण्याचं कंपनीने म्हटलं आहे. लखनऊनंतर दिल्लीत सुविधा सुरू होईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, WhatsApp सह इंटिग्रेशननंतर रायडर्सला आता उबर App डाउनलोड करण्याची गरज लागणार नाही. युजर रजिस्ट्रेशन, राइड बुकिंग आणि ट्रॅव्हल रिसिप्ट रिसीव्ह करण्यापासून सर्व गोष्टी WhatsApp Chat Interface मध्ये मॅनेज केलं जाईल.

ना पेट्रोल, ना डिझेल, ना CNG; नेमकी कशी चालते नितीन गडकरींची ही खास कार

WhatsApp मध्ये Uber कशी बुक कराल? - WhatsApp ओपन करा. - +91 792000002 नंबरवर Hi मेसेज पाठवा. - चॅटबॉट युजरकडे पिकअप आणि ड्रॉप-ऑफ लोकेशन मागेल. - त्यानंतर युजरला गाडी भाडं आणि ड्रायव्हर येण्याच्या वेळेची माहिती मिळेल.

WhatsApp ने एका महिन्यात बंद केले 20 लाखांहून अधिक अकाउंट, पाहा काय आहे कारण

कशी राखली जाईल युजर्सची सेफ्टी - उबरने आपल्या ब्लॉग पोर्टमध्ये डेव्हलपमेंटची घोषणा करताना सांगितलं, की रायडर्सला असेच सेफ्टी फीचर्स आणि इन्शुरन्स सेफ्टी मिळेल जे उबर App च्या माध्यमातून राइड बुक करतात. बुकिंग केल्यानंतर युजरला ड्रायव्हरचं नाव आणि ड्रायव्हरच्या लायसन्स प्लेटची माहिती दिली जाईल. युजर पिकअप पॉईंटमध्ये ड्रायव्हरचं लोकेशन ट्रॅक करू शकतात आणि एका मास्क्ड नंबरचा वापर करुन ड्रायव्हरशी Unknown पद्धतीने बोलूही शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात