Home /News /technology /

प्रवासादरम्यान बिनधास्त झोपा! आता रेल्वे घेणार तुमचं स्टेशन येण्यापूर्वी उठवण्याची जबाबदारी

प्रवासादरम्यान बिनधास्त झोपा! आता रेल्वे घेणार तुमचं स्टेशन येण्यापूर्वी उठवण्याची जबाबदारी

रेल्वे स्टेशन येण्याच्या 20 मिनिटे आधी 'वेकअप अलार्म' पाठवून प्रवाशांना जागं केलं जाणार आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या या सुविधेचा अधिक फायदा होणार आहे.

नवी दिल्ली 03 जून : भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेचं विस्तीर्ण जाळं तयार करण्यात आलं आहे. भारतीय रेल्वे देशाच्या (Indian Railway) कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहचली आहे. आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक रेल्वेला प्राधान्य देतात. विशेषत: जे लोक नियमितपणे लांबचा प्रवास करतात, त्यांची पहिली पसंती रेल्वेलाच मिळते. मात्र, रेल्वे प्रवासादरम्यान (Train Travel) आपल्याला हव्या त्या स्टेशनवर उतरायचं राहील या काळजीने अनेकांना झोप (Sleep) लागत नाही. अशा प्रवाशांनी आता रेल्वेमध्ये आरामात झोप घेतली तरी चालणार आहे. कारण, झोपलेल्या प्रवाशांना त्यांचे इच्छित स्टेशन (Destination) आल्यानंतर जागं करण्याची जबाबदारी भारतीय रेल्वेनं (Indian Railways) घेतली आहे. रेल्वे स्टेशन येण्याच्या 20 मिनिटे आधी 'वेकअप अलार्म' पाठवून प्रवाशांना जागं केलं जाणार आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या या सुविधेचा अधिक फायदा होणार आहे. तुमचा स्मार्टफोन हरवला आहे? Google Maps च्या मदतीने काही मिनिटांत शोधा, ही आहे प्रोसेस अनेकदा प्रवासादरम्यान झोप लागल्यामुळे अनेक रेल्वे प्रवाशांचे इच्छित स्टेशन मागे सुटून जााते व नंतर त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांची ही समस्या सोडवण्यासाठी रेल्वेने 'डेस्टिनेशन अलर्ट' (Destination Alert) सुविधा सुरू केली आहे. रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. विशेष म्हणजे या सुविधेसाठी प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. यासाठी रेल्वे प्रवाशांकडून फक्त तीन रुपये आकारले जाणार आहेत. कशा प्रकारे काम करतो वेकअप अलार्म रात्री प्रवास करणार्‍या प्रवाशांना इच्छित स्थळी (Destination) पोहोचण्यापूर्वी त्याच्या मोबाईलवर वेक-अप अलार्म (Wake Up Alarm) पाठविला जाईल. हा अलार्म ट्रेन स्टेशनवर येण्याच्या 20 मिनिटे आधी दिला जाईल. जेणेकरून प्रवासी झोपेतून जागे होतील आणि रेल्वेतून खाली उतरण्याची तयारी करतील. खोकला आणि घोरण्यावर नजर ठेवेल तुमचा फोन, Google कडून नव्या फीचरवर काम सुरू असा घ्या सुविधेचा लाभ रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून प्रवास करणारा कोणताही प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. यासाठी त्याला त्याच्या मोबाईलवरून 139 या आयआरसीटीसी (IRCTC) हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करावा लागेल. कॉल केल्यानंतर प्रवाशाला भाषा निवडण्यासाठी पर्याय दिला जाईल. यानंतर, वेकअप डेस्टिनेशन अलर्टसाठी सात आणि नंतर दोन हे आकडे दाबावे लागतील. नंतर प्रवाशाला त्याचा 10 अंकी पीएनआर क्रमांक टाकावा लागेल. पीएनआर क्रमांक (PNR Number) भरल्यानंतर एक अंक दाबून त्याची पुष्टी करावी लागेल. हे केल्यानंतर प्रवाशाचे इच्छित स्टेशन सेट केले जाईल आणि ते स्थानक येण्याच्या 20 मिनिटांपूर्वी त्याला अलर्ट मिळेल. तुम्ही जर रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर तुम्हीही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
First published:

Tags: Indian railway, Railway track, Sleep, Travel

पुढील बातम्या