Home /News /technology /

खोकला आणि घोरण्यावर नजर ठेवेल तुमचा फोन, Google कडून नव्या फीचरवर काम सुरू

खोकला आणि घोरण्यावर नजर ठेवेल तुमचा फोन, Google कडून नव्या फीचरवर काम सुरू

गुगल खोकला आणि घोरण्यावर नजर ठेवणाऱ्या फीचरवर काम करत आहे. गुगल हे फीचर आपल्या फोन पिक्सल किंवा अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये सामिल करू शकतं.

  नवी दिल्ली, 29 मे : सध्या अनेक कामं स्मार्टफोनवर केली जातात. स्मार्टफोनचा (Smartphone) वापर इतका वाढला आहे, की आता कंपन्या फिटनेससंबंधी गोष्टीही लहानशा फोनमध्ये देतात. स्मार्टफोनमधील अनेक Apps आपल्या तब्येतीकडे, शारीरिक हालचालींवरही नजर ठेवतात. आता गुगलने (Google) एका अशाच नव्या फीचरवर काम सुरू केलं आहे. गुगल खोकला आणि घोरण्यावर नजर ठेवणाऱ्या फीचरवर काम करत आहे. गुगल हे फीचर आपल्या फोन पिक्सल किंवा अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये सामिल करू शकतं. Google ने या फीचरवर काम करण्यासाठी Sleep audio collection स्टडी आयोजित केलं आहे, जे केवळ गुगल कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. गुगल हेल्थ स्टडी - 9to5google.com नुसार, गुगल खोकला आणि घोरणं याची ओळख करणाऱ्या एका फीचरवर काम करत आहे. गुगलच्या आरोग्य अभ्यासाची (Google Health Studies) दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. यात नव्या डिजीटल वेलबीइंग स्टडीचा (New Digital Wellbeing Study) खुलासा करण्यात आला आहे. यात स्लीप ऑडिओ कलेक्शनबाबत माहिती देण्यात आली आहे. सध्या हा अभ्यास गुगल कर्मचाऱ्यांसाठीच आहे. गुगलचे फूल टाइम कर्मचारी या अभ्यासात सामिल होऊ शकतात. कर्मचाऱ्यांकडे अँड्रॉइड फोन असणं गरजेचं आहे. या अभ्यासात कर्मचाऱ्यांना एका खोलीत झोपवलं जाईल आणि त्यानंतर डिव्हाइसच्या माध्यमातून त्यांच्यावर नजर ठेवली जाईल.

  हे वाचा - या नंबरवर चुकूनही Call करू नका, WhatsApp Account हॅक होण्याचा धोका

  मिळालेल्या माहितीनुसार, गुगल खोकला आणि घोरण्याच्या अल्गोरिदमला एका मॉनिटरिंग फीचरमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरुन युजरला त्याच्या झोपेबाबत छोट्या छोट्या गोष्टींची माहिती मिळेल. हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर कंपनी आपल्या स्मार्टफोनमध्ये हे मॉनिटरिंग फीचर्स सामिल करू शकते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Google, Tech news

  पुढील बातम्या