नवी दिल्ली, 11 डिसेंबर : जगभरात टेक्नोलॉजीच्या जोरावर अनेक प्रयोग करण्यात आले आहेत. नवनव्या फोनसह स्मार्ट टीव्ही, स्पीकर, बल्ब अशा अगणित गोष्टी लाँच झाल्या आहेत. आता लोकांना स्मार्ट मिररची (Smart mirror) सुविधा मिळणार आहे. टेक्नोलॉजी कंपनी portl नावाच्या स्टार्टअपने हा स्मार्ट मिरर लाँच केला आहे. हा मिरर आर्टिफिशियल इंजेलिजन्स अर्थात AI च्या मदतीने युजरला व्यायाम, योगा करण्यास मदत करणार आहे.
या मिररमध्ये आर्टिफिशियल इंजेलिजन्स इंजिन लावण्यात आलं आहे. यामुळे युजर्सला रियल टाइम फॉर्म फीडबॅक मिळेल. त्याशिवाय हा स्मार्ट मिरर व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला योग्य पोस्चर बनवण्यासाठीही मदत करेल.
या Smart Mirror ची साइज 40 किलो असून याची स्क्रिन साइज 43 इंच आहे. भिंतीवर हा मिरर उभा करुन ठेवता येतो. मिररला बायो सेंसर, HD कॅमेरा, Bluetooth आणि Wifi असे फीचर्स देण्यात आले आहेत. या मिररद्वारे योगा, Zumba, कार्डियोसारख्या लाइव्ह वर्कआउटची सुविधाही मिळेल.
हे स्टार्टअप इंद्रनील गुप्ता आणि विशाल चंदापेटा यांनी बनवलं आहे. या दोघांकडे फिटनेस आणि वेलनेस व्यवसायांचा 5 वर्षांचा अनुभव आहे. या Smart Mirror चं डिझाइन स्लिक आहे. हा मिरर Gamification आणि Engagement मॅकेनिजमवर काम करतो.
मिळालेल्या माहितीनुसार, या Smart Mirror ची किंमत 90 हजार रुपये आहे. यासाठी युजर्सला वेगवेगळे वर्कआउट सब्सक्रिप्शन प्लॅन खरेदी करावे लागतील. त्याची किंमत 500 रुपये प्रति महिना आहे. सध्या हा मिरर हैदराबाद आणि बँगलोरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news