WhatsApp वर आक्षेपार्ह मेसेज आला? अशी करा तक्रार; फॉलो करा सोप्या स्टेप्स
WhatsApp सध्या अनेकांसाठी कम्युनिकेशनसाठीचा, डेटा ट्रान्सफर करण्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग आहे. फोटो, व्हिडीओ कॉल, ऑडिओ कॉल, रेकॉर्डिंग, फाइल्स शेअरिंग अशा अनेक गोष्टी एकाच प्लॅटफॉर्म मिळत असल्याने WhatsApp इन्स्टंट मेसेजिंग App चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. WhatsApp वर एखाद्याने चुकीचा, आक्षेपार्ह मेसेज केल्यास त्या मेसेजला रिपोर्ट करता येऊ शकतं.
WhatsApp ने मागील अनेक दिवसांपासून आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक अपडेट दिले आहेत. परंतु तुमचा नंबर चुकीच्या हातात गेल्यास आक्षेपार्ह, फ्रॉड अशा मेसेजचा सामना करावा लागू शकतो.
2/ 7
WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी अशा आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्या लोकांविरोधात रिपोर्ट करण्याची सुविधा दिली आहे. रिपोर्ट करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
3/ 7
सर्वात आधी ज्या व्यक्तीच्या मेसेजला रिपोर्ट करायचं आहे, ते चॅट ओपन करा.
4/ 7
जो मेसेज आक्षेपार्ह आहे, त्या मेसेजवर 3 सेकंदपर्यंत सिलेक्ट करुन ठेवा.
5/ 7
त्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्यावर क्लिक करा.
6/ 7
आता Report पर्यायावर जा आणि त्यावर क्लिक करा.
7/ 7
आता तुम्ही मेसेज पाठवलेल्या त्या युजरला ब्लॉक करू इच्छिता का असा प्रश्न विचारला जाईल, तुमच्या इच्छेनुसार पर्यायावर क्लिक करा.