जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आता बारमध्ये गेलात तर गर्ल्स नाही 'रोबोट' बनविणार तुमचं कॉकटेल!

आता बारमध्ये गेलात तर गर्ल्स नाही 'रोबोट' बनविणार तुमचं कॉकटेल!

आता बारमध्ये गेलात तर गर्ल्स नाही 'रोबोट' बनविणार तुमचं कॉकटेल!

बारमध्ये गेल्यानंतर एक आकर्षण असतं ते बार गर्ल्सचं. त्यांच्या अदा पाहण्यासाठीच अनेक जण बारमध्ये जात असतात. मात्र आता त्यांच्या जागी रोबोट्सची नियुक्ती होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सोल 4 जून: कोरोनाव्हायरसमुळे जगातल्या लोकांचं जगणच सध्या बदलून गेलंय. लॉकडाऊनमुळे अनेक दिवस घरात बंद राहिल्यानंतर आता त्यात सुट दिली जात आहे. अनेक देशांमध्ये सगळे व्यवहार सुरू करायला परवानगी दिली जात आहे. कोरोनाव्हायरमुळे दक्षिण कोरियाला चांगलाच फटका बसला होता. मात्र त्यांनी त्यावर यशस्वी मात करत देश पुन्हा सुरू केला असून अनेक बदल केले आहेत. बारमध्ये गेल्यानंतर आता रोबोट तुमची सोबत करणार आहे. या बाबतचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा सर्वात महत्त्वाचा उपाय सांगितला जातो. त्याचा वापर आता बारमध्येही करण्यात येत आहे. बारमध्ये गेल्यानंतर एक आकर्षण असतं ते बार गर्ल्सचं. त्यांच्या अदा पाहण्यासाठीच अनेक जण बारमध्ये जात असतात. मात्र सोशल डिस्टन्सिंगमुळे आता बार मालकांनी गर्ल्सना रजा देत रोबोटची नियुक्ती केलीय. हे रोबोट्स मद्य आणून देणं, ते सर्व्ह करणं, कॉकटेल बनवणं अशा सगळ्या कामांमध्ये मदत करणार आहे. त्यामुळे तुम्हाला कंपनीही मिळेल आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालनही होईल. अशी अनेक कामे आता रोबोट्स करणार असल्याचें सकेत दिले जात आहेत. हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटल्स, दुकाने, अशा ठिकाणी आता अशा रोबोट्सचा उपयोग होणार आहे. पण त्यामुळे मात्र रोजगार कमी होणार असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पण कोरोनाचा प्रकोप किमान वर्षभर तरी राहण्याची शक्यता असल्याने असेच प्रयोग आता सगळ्याच क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. जे दक्षिण कोरियात झालं तेच आता भारतातही झालं तर नवल वाटणार नाही. हेही वाचा - आता 10 नाही तर 11 अंकी असणार मोबाईल नंबर? लवकरच तुमच्या फोनमध्ये होणार मोठे बदल मुलं चिडचिडी आणि रागिष्ट झालीत; असू शकतो मानसिक आजार दुधामध्येही वेगवेगळे प्रकार; तुमच्यासाठी कोणतं दूध आहे योग्य?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात