मुलं चिडचिडी आणि रागिष्ट झालीत; असू शकतो मानसिक आजार

मुलं चिडचिडी आणि रागिष्ट झालीत; असू शकतो मानसिक आजार

लहान मुलांच्या वागणुकीत असा बदल का होतो आणि त्यावेळी त्यांच्याशी कसं वागावं याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 04 जून : लहान मुलं मस्तीखोर असतातच ते स्वाभाविक आहे. मात्र एखादी गोष्ट मनाप्रमाणे न झाल्यास ती जास्त आक्रमक बनणं म्हणजे त्यांना एखादा मानसिक आजार असू शकतो. वैद्यकीय भाषेत याला अटेन्शन डेफिसिट हायपर डिसऑर्डर म्हणतात. ही एक मेंदूशी संबंधित समस्या आहे. ही समस्या लहान मुलांमध्ये प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळे मुलांच्या चिडचिडेपणाकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. बऱ्याचदा मुलं या आजाराने ग्रस्त असल्याचं पालकांना कळत नाही.

पालकांनी मुलांच्या स्वभावातील हे बदल लक्षात घेऊन तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे. जेणेकरून मुलाला या आजारातून बाहेर काढण्यास मदत होऊ शकले.

अटेन्शन डेफिसिट हायपर डिसऑर्डरची लक्षणं काय आहेत?

मूड बदलणं

एका जागी स्थिर न बसणं

बसल्यावर सतत हलत बसणे किंवा काहीतरी करत राहणे

कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देणे

शांत न राहणे

सतत विनाकारण बडबड करणे

एक काम करत असताना ते सोडून दुसऱ्या कामाकडे लक्ष देणे

राग आल्यावर वस्तू फेकून देणे

चिडचिडेपणा

नैराश्य

हे वाचा - लहान मुलांना Vitamin D सप्लिमेंट देणं योग्य आहे का?

अशा मुलांना सांभळणं पालकांसाठी आव्हानात्मक असतं. अशा मुलांना आवरणं अवघड असतं. पालकांना खूप संयम ठेवावा लागतो. यासाठी काही टीप्स

आपल्या मुलाशी बोला - आपल्या मुलांना राग येईल तेव्हा त्यांना चिडवू नका. यामुळे त्यांचा राग आणखी तीव्र होऊ शकतो. त्यांच्याशी बोला आणि त्यातून आक्रमकतेमागील खरे कारण जाणून घ्या. आपल्या मुलांबरोबर मित्रांप्रमाणे वर्तन करा. यामुळे मुलांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, हे जाणून घेण्यास मदत मिळते. जेणेकरून मुलांच्या मनातील नकारात्मक भावना तुम्ही दूर करू शकता. मुलाला मानसिक आजार असल्याचे लक्षात आल्यावर समाज काय बोलेल याचा विचार करून आजारपण लपवू नका. यामुळे समस्या अधिक बिकट बनू शकते.

मुलांना मारू नका - आपण मुलं इतर मुलांप्रमाणे सर्वसाधारण नाही, हे पालकांनी मनाशी पक्क केलं पाहिजे. कारण, जेव्हा मुलं आक्रमक वागतात त्यावेळी अनेक पालकांची चिडचिड होते. बरेच लोक मुलांना मारतात. असे करणे चुकीचं आहे. मुलं आक्रमक होत असेल तर त्यांच्यावर न चिडता त्यांची समजूत घातली पाहिजे. जेणेकरून मुलांचा राग शांत होईल.

हे वाचा - कृपया लहान मुलांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी पालकांना का दिला असा सल्ला?

राग शांत झाल्यावर समजूत काढा - जर मुलाने नकारात्मक वागणूक दर्शवली तर त्यांना लगेच रोखायला जाऊ नये. मुलाचा राग शांत झाल्यानंतर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करावा.

तोडगा काढण्याचा प्रयत्न करा - तुमच्या मुलाबरोबर बसा आणि त्याला जे वाटते त्याबद्दल मोकळे करा. समस्येवर उपाय शोधा. आपल्या मुलास ध्यान, योग किंवा श्वासोच्छवासाच्या व्यायाम करण्याची सवय लावा. ज्यामुळे मुलाच्या मनावर नियंत्रण राहिलं. आपल्या मुलामध्ये ज्या परिस्थितीत आक्रमक होतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

हे वाचा - लॉकडाऊनमध्ये तुमचीही चिडचिड होतेय का? मग हे उपाय करा

पडद्यावरील वेळ कमी करा - दूरदर्शन पाहणे, व्हिडिओ गेम खेळणे किंवा टॅब्लेट वापरण्यात घालवलेल्या वेळेमुळे मुले आक्रमक किंवा हिंसक होऊ शकतात. आपल्या मुलास सामोरे जाणाऱ्या सामग्रीचे नियमन आणि निरीक्षण करणे आवश्यक आहे. टीव्ही पाहण्यासाठी किंवा व्हिडिओ गेम खेळण्यासाठी वेळापत्रक सेट करा. मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. आपल्या मुलांसाठी माहितीपूर्ण प्रोग्राम निवडा किंवा त्यांच्याबरोबर मैदानी किंवा घरातील खेळ खेळा.

मुलांना प्रोत्साहन द्या - आपल्या मुलास बक्षीस देणे खूप महत्वाचे आहे. आपल्या मुलामध्ये सकारात्मक वर्तनात्मक बदल लक्षात घेतल्यास, चांगल्या वर्तनासाठी त्याचे कौतुक करा. जेणेकरून मुलाला प्रोत्साहन मिळेल.

हे वाचा - तुम्हाला कोरोनापासून वाचवणारा साबण 4500 वर्षांपूर्वीच असा तयार झाला

लेखक - डॉ. मुबाशीर मुझमिल खान, सल्लागार बालरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, नवी मुंबई

First published: June 4, 2020, 3:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading