advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / दुधामध्येही वेगवेगळे प्रकार; तुमच्यासाठी कोणतं दूध आहे योग्य?

दुधामध्येही वेगवेगळे प्रकार; तुमच्यासाठी कोणतं दूध आहे योग्य?

प्रत्येक दुधामध्ये (Milk) वेगवेगळे पोषक घटक असतात.

01
दुधाला पूर्णान्न म्हटलं जातं. मात्र सामान्यपणे हाडांना मजबुती मिळावी म्हणून सर्वजण दूध पितात. मात्र दुधामध्ये इतके पोषक घटक असतात, ज्यामुळे शरीराला त्याचे इतर फायदेही होतात. विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं दूध मिळतं आणि त्यांचे फायदेही वेगवेगळे असतात.

02
गायीचं दूध - जर्नल ऑफ पीडियाट्रिक गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी अँड न्यूट्रिशन मध्ये 2017 साली प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार गायीच्या दुधात प्रोटिन भरपूर असतं. याशिवाय यामध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉस्फरस, मॅग्नेशिअमसारखे मिनरल्स असतात. तसंच अँटिऑक्सिडंटही असतात.

03
म्हशीचं दूध - लिपिड्स इन हेल्थ अँड डिसीजमधये 2017 प्रकाशित अभ्यासनुसार म्हशीचं दूध गायीच्या दुधापेक्षा हेल्दी असतं. यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी असतं. शिवाय अमिनो असिड, सिलेनियम, झिंक आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात.

04
बकरीचं दूध - एशियन-ऑस्ट्रेलेशियन जर्नल ऑफ अ‍ॅनिमल सायन्सेजमध्ये साल 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्टडीनुसार, हे दूध पचण्यास हलकं असतं. त्यात फॅट कमी असतं. पोषक घटकही भरपूर असतात.

05
उंटाचं दूध - इलेक्ट्रॉनिक फिजिशियनमध्ये 2015 साली प्रकाशित अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, उंटाच्या दुधात ग्लुकोज आणि कोलेस्ट्रॉल कमी असतं, मात्र व्हिटॅमिन सी आणि आयर्न, पोटॅशिअम, कॉपर, झिंक आणि मॅग्नेशिअम असे मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.

06
सोया मिल्क – सोयाबीन्स किंवा सोय प्रोटिनपासून तयार होणारं सोया मिल्क हे गायीच्या दुधाला उत्तम असं पर्याय मानलं जातं. यामध्ये गायीच्या दुधाइतकेच प्रोटिन, फॅट आणि कार्बोहायड्रेट असतात. शिवाय अमिनो असिडही असतं ज्यामुळे पूर्ण प्रोटिन म्हणून हे दूध प्यायलं जातं.

07
बदामाचं दूध – आपल्या आरोग्याबाबत जागरूक असलेले लोकं बदामाचं दूध पिणं पसंत करतात. या प्रोटिन, व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सिडंट घटक भरपूर प्रमाणात असतात आणि कॅलरीज कमी असतात.

08
नारळाचं दूध - नारळाचं दूध ब्लड कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास आणि वजन कमी करण्यात मदत करत असल्याचं मानलं जातं. नॉन डेअरी दुधापैकी एक असलेल्या नारळाच्या दुधात पोषक घटक कमी असतात.

09
ओट मिल्क – गायीच्या दुधाच्या तुलनेत यामध्ये प्रोटिन आणि फॅटचं प्रमाण कमी असतं. मात्र कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यात मदत करत असल्यानं ओट मिल्क हेल्दी मानलं जातं.

  • FIRST PUBLISHED :
  • दुधाला पूर्णान्न म्हटलं जातं. मात्र सामान्यपणे हाडांना मजबुती मिळावी म्हणून सर्वजण दूध पितात. मात्र दुधामध्ये इतके पोषक घटक असतात, ज्यामुळे शरीराला त्याचे इतर फायदेही होतात. विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं दूध मिळतं आणि त्यांचे फायदेही वेगवेगळे असतात.

    MORE
    GALLERIES