Home /News /technology /

आता 10 नाही तर 11 अंकी असणार मोबाईल नंबर? लवकरच तुमच्या फोनमध्ये होणार मोठे बदल

आता 10 नाही तर 11 अंकी असणार मोबाईल नंबर? लवकरच तुमच्या फोनमध्ये होणार मोठे बदल

लॉकडाऊनमध्ये लोकांनी सर्वाधिक कॉमिक आणि वाचनाशी संबंधीत अ‍ॅप्स डाउनलोड केल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

लॉकडाऊनमध्ये लोकांनी सर्वाधिक कॉमिक आणि वाचनाशी संबंधीत अ‍ॅप्स डाउनलोड केल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

आता तुमच्या मोबाईल क्रमांकात होणार आहेत बदल,जाणून घ्या महत्त्वाचे बदल एका क्लिकवर.

    नवी दिल्ली, 04 जून : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मोबाईल क्रमांकामध्ये काही महत्त्वाचे बदल केले जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र यात मोबाइल क्रमांक योजनेत (mobile numbering scheme) कोणतेही बदल केले जाणार नाही आहेत. ट्रायनं स्पष्टीकरण दिलं आहे की त्यांनी डायलिंगच्या पद्धतीमध्ये थोडा बदल सुचविला आहे, मात्र यात मोबाईल क्रमांकात बदल होणार नाही. ट्रायच्या शिफारसींच्या आधारे कोणते बदल होऊ शकणार नाही ते जाणून घेऊया. >>ट्रायनं मोबाईलसाठी 11 अंकी क्रमांकाची योजना तयार केलेली नाही. ट्रायनं स्पष्ट केलं आहे की, मोबाईल क्रमांकासाठी 11 अंकी नंबरची योजना रद्द करण्यात आली आहे. >> भारतात आता मोबाईल क्रमांक हे पहिल्या प्रमाणे 10 अंकीच असणार आहेत. असे होऊ शकतात बदल --TRAIने फिक्स्ड लाइनवरून कॉल करतांना मोबाईल क्रमांकासमोर '0' लावण्यास सांगितले आहे. सध्या, फिक्स्ड लाइन कनेक्शनद्वारे आंतर-सेवा क्षेत्र मोबाइल कॉल करण्यासाठी प्रथम '0' आवश्यक आहे. मोबाईल वरून लँडलाईनवर कॉल करताना '0' लावण्याची आवश्यकता नसते. - TRAIने म्हटले आहे की हा डायलिंग पॅटर्नमधील बदल भविष्यातील बदलांसाठी आवश्यक आहे. ज्याच्या मदतीनं मोबाइल सेवांसाठी 2544 दशलक्ष अतिरिक्त क्रमांकन संसाधने तयार होतील. -- TRAIने आपल्या शिफारशींमध्ये म्हटले आहे की फिक्स्ड-टू-फिक्स्ड, मोबाईल-टू-फिक्स्ड आणि मोबाईल-टू-मोबाइल कॉलसाठी डायलिंग प्लॅन बदलण्याची गरज नाही. -- याआधी बहुतेक टेलिकॉम ऑपरेटरांनी मोबाइल नंबरसाठी 11-अंकी क्रमांकाचा विरोध केला. त्यांच्या मते, 11 अंकी क्रमांकन योजनेमध्ये सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरसाठी मोठ्या प्रमाणात कॉन्फिगरेशनमध्ये बदल करणे आवश्यक आहे, म्हणजे दूरसंचार कंपन्यांसाठी अतिरिक्त खर्च, त्यामुळं ट्रायनं असे करण्यास नकार दिला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या