मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Noise Flair neckband : जबरदस्त फीचर्ससह लॉन्च झाला हा हेडफोन; पाहा काय आहे खासियत

Noise Flair neckband : जबरदस्त फीचर्ससह लॉन्च झाला हा हेडफोन; पाहा काय आहे खासियत

न्वाइज कंपनीने धमाकेदार फीचर्ससह Flair neckband या हेडफोनला लॉन्च केलं आहे. त्यामुळं आता ग्राहकांना या हेडफोनमुळं (Noise Flair neckband headphone) चांगल्या सुविधा मिळणार आहेत. हा हेडफोन दोन कलरमध्ये देण्यात येणार असून त्यात 10mm चा ड्रायवर्सचा (special features) समावेश असणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : आपल्याला अनेकदा गाणी किंवा चित्रपट पाहण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे हेडफोन्स हवे असतात. त्यामुळं आपल्याला जे ऐकायचंय त्याचा आनंद घेता येतो आणि त्या आवाजाचा त्रास इतरांना होत नाही. त्यामुळं आता जर तुम्ही चांगल्या दर्जाचा हेडफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण न्वाइज कंपनीने धमाकेदार फीचर्ससह Flair neckband या हेडफोनला लॉन्च केलं आहे. त्यामुळं आता ग्राहकांना या हेडफोनमुळं (Noise Flair neckband headphone) चांगल्या सुविधा मिळणार आहेत.

हा हेडफोन दोन कलरमध्ये देण्यात येणार असून त्यात 10mm चा ड्रायवर्सचा (special features) समावेश असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला व्यायाम करताना किंवा इतर पावसात असताना आपला हेडफोन (neckband) भिजतो. त्या वेळी ते खराब होण्याचीही शक्यता असते. परंतु या हेडफोनमध्ये वाटरप्रुफची सुविधा देण्यात आल्यानं हा पाण्यात पडला तरी या हेडफोनला काहीही प्रॉब्लेम येणार नाही.

Aadhaar द्वारे बँक खातं रिकामं होऊ शकतं? UIDAI ने दिली महत्त्वपूर्ण माहिती

Noise Flair neckband ची मूळ किंमत ही 2,499 आहे परंतु विशेष ऑफरमुळं आपल्याला हे हेडफोन 1,099 रूपयांना खरेदी करता येणार आहे. आता ही ऑफर किती दिवस राहिल याविषयी कंपनीनं अजून कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. परंतु सध्या या प्रॉडक्ट्ला अमेझॉन आणि न्वाइजच्या अधिकृत वेबसाईटवर खरेदी करता येणार आहे.

1 नोव्हेंबरपासून या स्मार्टफोनमध्ये बंद होणार WhatsApp;यात तुमचा फोन तर नाही ना?

न्वाइजच्या या नव्या हेडफोनमध्ये एयरबड्स देण्यात आले असून त्याचबरोबर या हेडफोन्सबरोबरगूगल असिस्टंटचाही सपोर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हेडफोनला दोन स्मार्टफोनसोबत जोडता येईल. केवळ 8 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगमुळं 8 तासांचा बॅटरी बॅकअप मिळणार आहे. त्याचबरोबर हे हेडफोन 30 ग्रॅम वजनाचे असून आपल्याला वापरायलाही हलके आहे.

First published:

Tags: Tech news, Technology