नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. अगदी मुलांना शाळेच्या अॅडमिशनपासून ते बँकेचं अकाऊंट (bank account) ओपन करण्यापर्यंत आधार कार्डची गरज लागते. त्यामुळे आता नागरिकांना इतर कोणतेही कागदपत्र नसले, तरी आधार कार्ड (Aadhar number) असणं अत्यावश्यक झालं आहे.
आधार कार्ड महत्त्वपूर्ण असताना, दुसरीकडे त्याचा गैरवापरही होताना दिसत आहे. आधार (Aadhar) कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करावं लागत असल्याने, याचा फायदा फ्रॉडस्टर्सकडून घेतला जातो. आधार कार्डच्या नावे आतापर्यंत अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यासंदर्भात UIDAI ने आधार कार्डच्या सुरक्षेसंदर्भात (UIDAIs instructions) सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे आपल्या आधार कार्डच्या नावे फसवणूक होऊ नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं फायदेशीर ठरू शकतं.
भारतातील आधार कार्डची ऑथोरॉटी असलेल्या UIDAI ने आधार कार्डच्या सुरक्षेसंदर्भात काही सूचना जारी केल्या आहेत. आपल्या आधार कार्डचा गैरवापर करून कुणीही आपल्या बँक खात्यातून रक्कम काढू शकत नाही. परंतु यासाठी आपण व्यवहार करताना कुणालाही आधार कार्ड नंबर किंवा त्यावर येणारा OTP शेयर करू नये. कारण त्यामुळे आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार आपण आपल्या ATM कार्डच्या सुरक्षेची जशी काळजी घेतो तशीच आपल्या आधार कार्डचीही घ्यायला हवी.
अशी घ्या काळजी -
आपल्या आधारकार्डवर आलेला OTP कुणालाही देऊ नये, त्याचबरोबर अनोळखी आणि फसव्या लिंकवरही क्लिक करू नये. अशा फेक लिंकमुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. आपलं आधार कार्ड कुणाच्या हाती पडलं, परंतु ओटीपी, लिंक या काही गोष्टी शेअर केल्या नाही, या बाबींकडे कटाक्षाने लक्ष दिल्यास आपलं बँक अकाउंट कुणीही हॅक करू शकत नाही, अशी माहिती UIDAI ने दिली आहे.
आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केल्यानंतर आपल्याला व्यवहारांसाठी किंवा KYC करण्यासाठी बँकेत जायची गरज पडत नाही. एकदा आपण आपला आधार नंबर आपल्या खात्याशी लिंक केला, तर घरबसल्या आपले सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीनं करू शकतो. त्याचबरोबर आता रिझर्व बँकेने आधार कार्डला अधिकृत दस्तावेजाचा दर्जाही दिलेला आहे. त्यामुळे आधार कार्डला अधिक सुरक्षित मानलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, Aadhar card link, Online fraud, Online security