नवी दिल्ली, 12 मार्च : टेलिकॉम कंपनी भारती एयरटेलने (Bharti Airtel) ग्राहकांसाठी ई-सिम (eSIM) ही एक नवी सर्विस आणली आहे. या नव्या सर्विसमुळे लोक आता फोनमध्ये विना फिजिकल सिम कार्ड टाकल्याशिवायच कॉल आणि इंटरनेट सर्विसचा आनंद घेऊ शकतील. एयरटेल युजर्स हे ई-सिम कोणत्याही एयरटेल स्टोरमधून घेऊ शकतात. काय असतं eSIM - सब्सक्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल (subscriber identity module) हा SIM चा फुल फॉर्म आहे. यात युजरची ओळख सांगणारी माहिती असते. सिम कार्डचं इलेक्ट्रॉनिक रुप म्हणजे हे ई-सिम आहे. या सिस्टममध्ये फिजिकल सिम कार्ड टाकण्याची गरज लागत नाही. ई-सिम स्मार्टफोनमध्ये लागणारं एक व्हर्च्युअल सिम असतं. eSIM कसं कराल अॅक्टिवेट? - आपल्या डिव्हाईसवर Airtel eSIM अॅक्टिव्ह करण्यासाठी, तुमच्या फिजिकल सिम कार्डला eSIM मध्ये बदलावं लागे. यासाठी एका मेसेजमध्ये eSIM registered email id टाईप करुन 121 वर पाठवावा लागेल. - जर तुमचा ईमेल आयडी वैध असेल, तर एयरटेल या प्रोसेसची पुष्टी करण्यासाठी 121 वरुन एक SMS पाठवेल.
(वाचा - Aadhaar च्या चुकीच्या वापराबाबत आता नो टेन्शन; गरजेनुसार असं करा लॉक-अनलॉक )
- eSIM रिक्वेस्ट कन्फर्म करण्यासाठी 60 सेकंदाच्या आत मेलवर 1 लिहून उत्तर द्यावं लागेल. - जर ईमेल आयडी वैध नसेल, तर Airtel समर्थन देईल आणि युजर्ससाठी eSIM अॅक्टिवेशन प्रोसेस पुन्हा सुरू करेल. - एकदा eSIM रिक्वेस्ट कन्फर्म झाल्यानंतर, Airtel अधिकारी शेवटची परवानगी मागेल आणि QR कोडबाबत माहिती देण्यासाठी तुमच्याशी संपर्क करेल. - संपूर्ण परवानगीच्या प्रक्रियेनंतर, युजर्सला त्यांच्या ईमेल आयडीवर एक अधिकृ QR कोड मिळेल. युजरने QR कोड स्कॅन केल्यानंतर eSIM अॅक्टिवेशनसाठी जवळपास दोन तास लागतील.
(वाचा - वाहनांवर स्क्रॅपिंग पॉलिसीचे सर्वसामान्यांना होणार हे 5 मोठे फायदे; पाहा डिटेल्स )
QR कोड कसा होईल स्कॅन? - कंपनीकडून ईमेलवर आलेल्या QR कोडला स्कॅन करण्यासाठी, युजरला आपल्या डिव्हाईसच्या सेटिंग्जमध्ये जाऊन Wifi नेटवर्कशी कनेक्ट करावं लागेल. - Wifi नेटवर्कशी कनेक्ट केल्यानंतर, मोबाईल नेटवर्कवर क्लिक करा आणि अॅडव्हान्स ऑप्शनवर जा. - अॅडव्हान्स सेटिंग्जमध्ये अॅड कॅरियरवर क्लिक करुन QR कोड स्कॅन करा. - एकदा कोड स्कॅन केल्यानंतर, डाउनलोड बटनवर क्लिक करा आणि प्रोसेस पूर्ण करा.

)







