मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Oximeter शिवायच चेक करा ऑक्सिजन लेवल; आता मोबाईलच्या फ्लॅशलाईटने चेक करता येणार Oxygen Level

Oximeter शिवायच चेक करा ऑक्सिजन लेवल; आता मोबाईलच्या फ्लॅशलाईटने चेक करता येणार Oxygen Level

कोलकातामधील हेल्थ स्टार्टअपने एक मोबाईल अ‍ॅप डेव्हलप केलं आहे, जे ऑक्सिमीटरच्या जागी वापरता येऊ शकतं.

कोलकातामधील हेल्थ स्टार्टअपने एक मोबाईल अ‍ॅप डेव्हलप केलं आहे, जे ऑक्सिमीटरच्या जागी वापरता येऊ शकतं.

कोलकातामधील हेल्थ स्टार्टअपने एक मोबाईल अ‍ॅप डेव्हलप केलं आहे, जे ऑक्सिमीटरच्या जागी वापरता येऊ शकतं.

नवी दिल्ली, 24 मे : कोरोना महामारीच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेदरम्यान देशात अचानक पल्स ऑक्सिमीटरबाबत (Pulse Oximeter) मोठी चर्चा सुरू झाली. हे छोटंस डिव्हाईस शरीरात ऑक्सिजन लेवल (oxygen saturation level) तपासण्यासाठी मदत करतं. आरोग्य विभागाकडून होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना वेळोवेळी ऑक्सिजन लेवल विचारली जाते, जेणेकरुन ऑक्सिजन लेवल कमी झाल्यास, वेळीच रुग्णाला रुग्णालयात आणलं जाऊ शकतं. त्यामुळेच पल्स ऑक्सिमीटरची मागणी वाढली. परंतु बाजारात आता ऑक्सिमीटरचीही कमतरता असल्याची माहिती आहे.

आजच्या काळात ऑक्सिमीटर घरात असणं फायद्याचं ठरतं. मागणी वाढल्यामुळे ऑक्सिमीटरच्या किंमतीत वाढ झाली आहे. परंतु आता एक अ‍ॅप डेव्हलप करण्यात आलं आहे, ज्यामुळे ऑक्सिजन लेवल, ऑक्सिमीटरशिवाय चेक करता येऊ शकते.

कोलकातामधील हेल्थ स्टार्टअपने एक मोबाईल अ‍ॅप डेव्हलप केलं आहे, जे ऑक्सिमीटरच्या जागी वापरता येऊ शकतं.

फ्रीमध्ये करा डाउनलोड -

या मोबाईल अ‍ॅपचं नाव CarePlix Vital असं आहे. या अ‍ॅपद्वारे युजरची ब्लड ऑक्सिजन लेवल, पल्स आणि रेसप्रेशन रेट्स (Respiration Rate) मॉनिटर करण्याचं काम केलं जातं. ही टेक्नोलॉजी स्मार्टफोनच्या रियर कॅमेरा आणि टॉर्चद्वारे काम करणार आहे.

या मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्यासाठी युजरला स्मार्टफोनच्या रियर कॅमेरा आणि फ्लॅशलाईटवर हाताचं बोट ठेवावं लागेल. काही सेकंदाच ऑक्सिजन सॅच्युरेशन (SpO2), पल्स आणि रेसप्रेशन लेवल डिस्प्लेवर दिसते. CarePlix Vital गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप स्टोरवरुनही फ्रीमध्ये डाउनलोड केलं जाऊ शकतं.

(वाचा - तुम्ही Oximeter चा चुकीचा वापर तर करत नाही ना? केंद्राने सांगितली योग्य पद्धत)

CareNow Healthcare चे को-फाउंडर सुभब्रत पॉल यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, लोकांना ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि पल्स रेट तपासण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर डिव्हाईसची गरज भासते. परंतु आम्ही या मोबाईल अ‍ॅपमध्ये इंटरनल टेक्नोलॉजी फोटोप्लेथिस्मोग्राफीचा (PPG) वापर केला आहे.

(वाचा - Alert! शरीरातील Oxygen लेवल तपासण्यासाठी अ‍ॅप वापरताय, तर आधी हे वाचा)

दरम्यान, पल्स ऑक्सिमीटरद्वारे, लाल रक्त कोशिका (RBCs) किती ऑक्सिजन इथून तिथे घेऊन जातात याची माहिती मिळते. याला PPO अर्थात पोर्टेबर पल्स ऑक्सिमीटर असं म्हटलं जातं. या डिव्हाईसमुळे डॉक्टर, नर्सेस यांना एखाद्या व्यक्तीला अतिरिक्त ऑक्सिजनची आवश्यकता आहे, की नाही हे जाणून घेण्यास मदत होते.

First published:

Tags: Tech news