नवी दिल्ली, 14 डिसेंबर : गेल्या काही काळापासून बाजारात 5G स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. पण भारतात 5G नेटवर्क आलेलं नाही. कोणताही नेटवर्क प्रोव्हायडर 5G देत नाही. तरीही अनेक कंपन्या 5G स्मार्टफोनची विक्री करत आहे. 5G फोन घेण्याचा काय फायदा आहे? 5G फोनला प्राथमिकता द्यावी की नाही?
जर 20 हजार रुपयांहून अधिकचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर निश्चितपणे त्यात 5G नेटवर्क असलेला फोन घेणं फायद्याचं ठरेल. सध्या भारतात हे पर्याय कमी आहेत. तसंच जर तुम्ही एक फोन अधिक काळ 2 ते 3 वर्षापर्यंत चालवत असाल, तर 5G स्मार्टफोन घेणं फायद्याचं ठरेल, कारणं पुढील एक ते दोन वर्षात भारतात 5G लाँच होऊ शकतं.
रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी नुकतंच, 2021 च्या मध्यापर्यंत Jio 5G लाँच करणार असल्याचं सांगितंल. Jio ने बाजारात 5G लाँच केल्यास, त्यानंतर एयरटेल, वोडाफोन-आयडियाही 5G लाँच करतील. भारतात टेलिकॉम कंपन्यांनी 5G सुरू केल्यास, 4G फोन स्लो वाटू लागेल. पण असं का होईल? काही वर्षांपूर्वी 3G स्पीड चांगला होता. परंतु जसं मार्केटमध्ये 4G आलं, तसं 3G ची परिस्थिती खराब झाली होती. त्यामुळे बाजारात आता 5G आल्यास, 4G ची स्थितीही 3G प्रमाणे होऊ शकते. म्हणजेच स्पीडमध्ये समस्या येईल.
त्यामुळे अधिक काळापर्यंत फोन चालवत असाल आणि तुमचं बजेट 20 हजारहून अधिक असेल, तर 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात. तसंच या बजेटच्या आत 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर काही काळ वाट पाहू शकतात. कारण काही महिन्यांनंतर 5G स्मार्टफोन स्वस्त दरात खरेदी करू शकता. अनेक कंपन्या स्वस्त दरातील 5G स्मार्टफोनवर काम करत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षात 5G नेटवर्क आल्यास फोन अपग्रेड करण्याची किंवा स्पीड कमी होण्याची समस्या येणार नाही आणि 5G स्मार्टफोन घेतल्याचा फायदाही होईल.