जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Made in India: देशातील पहिलं सेल्फ सॅनिटायझिंग फेस मास्क; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Made in India: देशातील पहिलं सेल्फ सॅनिटायझिंग फेस मास्क; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Made in India: देशातील पहिलं सेल्फ सॅनिटायझिंग फेस मास्क; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणं सर्वात प्रभावी उपाय आहे. देशभरात मास्क घालणं अनिवार्य असून अनेक कंपन्यांनी विविध मास्क लाँच केले आहे. याचदरम्यान Breathe Easy कंपनीने एक खास मास्क ‘KARBON’ लाँच केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : कोरोना व्हायरस देशभरात पसरला आहे. कोरोनावरील लस येत नाही, तोपर्यंत कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणं सर्वात प्रभावी उपाय आहे. मास्क घालणं हेच कोरोनाविरोधातील मोठं हत्यार ठरतं आहे. देशभरात मास्क घालणं अनिवार्य असून अनेक कंपन्यांनी विविध मास्क लाँच केले आहे. याचदरम्यान Breathe Easy कंपनीने एक खास मास्क ‘KARBON’ लाँच केलं आहे. ‘KARBON’ फेस मास्क 95 टक्क्यांपर्यंत व्हायरसला निष्क्रिय करण्यात सक्षम असल्याचा दावा केला आहे. Breathe Easy Karbon Mask ची किंमत 799 आहे. सध्या कंपनीने हे मास्क काळ्या रंगात लाँच केलं आहे. हे मास्क नेल्सन लॅब्सद्वारा प्रमाणित करण्यात आलं आहे. याला तीन लेयर देण्यात आल्या आहेत. बाहेरचा लेयर एक फॅब्रिक लेयर आहे, जो बायोटेक्नोलॉजीचा उपयोग करून एयरबोर्न कंटेंट ब्लॉक करतो. डबल-नाइट लेयर हवेत असणाऱ्या कणांना अवरोधित करतो. तिसऱ्या बायोफॅब्रिक लेयरमध्ये ऍन्टी-मायक्रोबियल गुण असतात, जे व्हायरस आणि बॅक्टेरिया मारण्यात सक्षम असल्याचं सांगण्यात आलं आहे.

(वाचा -  भारतीयांची या पदार्थाला सर्वाधिक पसंती,लॉकडाऊनमध्ये सेकंदाला एकाहून जास्त ऑडर्स )

मास्कच्या आतील लेयर सॉफ्ट असून जे अधिक काळापर्यंत लावलं जाऊ शकतं, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. मास्कच्या आतील लेयर सेल्फ सॅनिटायझिंग आहे. तसंच ते हाय क्वालिटी यार्न कपड्यापासून बनवण्यात आलं आहे. Karbon चं हे मास्क 50 वेळा धुता येतं. यापूर्वी Xiaomi कंपनीनेही फेस मास्क लाँच केलं होतं.

(वाचा -  Xiaomi लॉन्च करणार कंप्यूटराईज Face Mask; जाणून घ्या काय असेल खास )

हे मास्क थ्री डायमेंशनल फ्रेम डिझाईनचं आहे. या डिझाईनमुळे मास्क चेहऱ्यावर पूर्णपणे फिट बसतं. मास्कच्या सपोर्ट फ्रेमच्या शेपला, शेपिंग पार्टवर प्रेस करून बदलता येऊ शकतं. हे मास्क युजर्सच्या ब्रीद क्वालिटीलाही ट्रॅक करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: mask
  • First Published :
जाहिरात
जाहिरात