नवी दिल्ली, 24 डिसेंबर : 1 जानेवारी 2021 पासून देशातील सर्व टोल नाक्यांवर FASTag आवश्यक आहे. Digital पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि Toll प्लाजावर लागणाऱ्या लांब रांगांपासून सुटका करण्यासाठी ही सिस्टम आवश्यक करण्यात आली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर सर्व वाहनांसाठी FASTag अनिवार्य करण्यात आला आहे. त्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिलेल्या माहितीनुसार, FASTag तिथेच रिचार्ज करा, जेथे तो खरेदी केला आहे. म्हणजेच ज्या बँकेतून तो खरेदी केला आहे, त्याच बँकेतून तो रिचार्ज करावा लागेल.
जर ग्राहकाने दुसऱ्या बँकेतून FASTag रिचार्ज केल्यास, त्याला 2.5 टक्के लोडिंग चार्ज द्यावा लागेल. म्हणजेच 1 हजार रुपयांचा रिचार्ज केल्यास, त्यावर 25 रुपये अधिक द्यावे लागतील.
तसंच एखाद्या बँकेची FASTag सुविधा आवडली नसल्यास, मोबाईल नंबरप्रमाणे पोर्टही करता येईल. ग्राहक FASTag आधी घेतलेल्या बँक किंवा एजेन्सीला रिटर्न करू शकतो आणि दुसऱ्या बँकेतून तो घेता येऊ शकतो. अशाप्रकारे FASTag पोर्ट केल्यानंतर यात नंबर आधीचाच राहतो. परंतु एकदा FASTag घेतल्यानंतर, ग्राहक 3 महिन्यांनंतरच, port सर्व्हिस वापरू शकतो.
इथे घेता येईल FASTag -
देशातील जवळपास सर्व मोठ्या सरकारी आणि प्रायव्हेट बँका SBI, ICICI, HDFC, AXIS BANK मधून FASTag घेऊ शकता. अॅमेझॉनवरूनही ऑनलाईन, तसंच paytm द्वारेही FASTag खरेदी करता येतो. मोठ्या पेट्रोल पंपावरही फास्टॅग खरेदी करण्याची सुविधा आहे.
1 जानेवारी 2021 पासून टोल प्लाजाच्या सर्व कॅश लेन FASTag लेनमध्ये बदलल्या जातील. 1 जानेवारीपासून कोणत्याही टोल प्लाजावर टोल कॅश स्वरुपात भरता येणार नाही. जर तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल, तर तुमची गाडी टोलवरून पास होणार नाही. जर गाडी काढायची असेल, तर एका खास सर्व्हिसचा वापर करावा लागेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल प्लाजावर प्री-पेड टच अँड गो कार्ड असेल. टोल प्लाजावर गर्दी टाळण्यासाठी 1 जानेवारीपासून सर्व हायब्रिड लेनवर प्री-पेड कार्ड सुविधा सुरू केली जाईल.
1 जानेवारीपासून ज्यांच्या गाडीला फास्टॅग नसेल, त्यांना टोलसाठीचा दंड भरावा लागेल. हा दंड प्री-पेड कार्ड कॅशच्या स्वरुपात काम करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Toll plaza