नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : Video स्ट्रीमिंगमध्ये मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर आता Netflix ने गेमिंग क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आता नेटफ्लिक्सन कंपनीनं App मध्ये पाच नव्या गेम्सचा समावेश करण्याची घोषणा केली आहे. मागच्या वर्षापासून (Netflix announces 5 new games) नेटफ्लिक्सवर या गेम्सचं टेस्टिंग सुरू होतं. अखेर आता Netflix ने नव्या पाच गेमच्या लॉन्चिंची घोषणा ट्विटरद्वारे केली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यात युजर्सला गेमिंगचा (netflix game for free subscription) आनंद घेण्यासाठी वेगळ्या सब्सक्रिप्शन्सची गरज नसेल. विशेष म्हणजे ही गेमिंगची सुविधा नेटफ्लिक्सने जगभरातील युजर्ससाठी जारी केली आहे. या पाच गेम्समध्ये Card Blast : (Amuzo & Rogue Games) Stranger Things: 1984 (BonusXP), Stranger, Things 3: The Game (BonusXP), Shooting Hoops :(Frosty Pop), आणि Teeter Up :(Frosty Pop) या गेमचा समावेश असणार आहे.
सध्या फक्त अँड्रॉईड यूजर्सलाच मिळणार गेमिंगची सुविधा -
नेटफ्लिक्सने जारी केलेल्या गेमिंगची सुविधा सध्या फक्त अँड्रॉईड युजर्सलाच असणार आहे. त्याचबरोबर लहान मुलांना गेमिंगपासून दूर ठेवण्यासाठी पासवर्डदेखील देण्यात येणार आहे. नेटफ्लिक्सने गेमिंगसाठी BonusXP, Los Gatos सारख्या कंपन्यांसोबत पार्टनरशिप केलेली आहे.
गेमिंगसाठी एक्स्ट्रा चार्जेसची गरज नाही -
Netflix वर या गेमिंगचा आनंद घेण्यासाठी युजर्सला कोणत्याही (No separate subscriptions on Netflix games) प्रकारे एक्स्ट्रा चार्जेस देण्याची गरज नाही. त्याशिवाय वेगळं सब्सक्रिप्शन घेण्याचीही गरज नसेल. युजर्ससाठी ही सुविधा मोफत असणार आहे. विशेष म्हणजे गेमिंगदरम्यान त्यात कुठल्याही जाहिरातींचा अडथळा येणार नाही. त्याचबरोबर गेंमिंगसाठी हिंदी, बंगाली, पंजाबी आणि मराठी भाषांचाही पर्याय देण्यात आला आहे.
कशी असणार गेमिंगची प्रोसेस?
Netflix App ओपन केल्यानंतर आता गेमिंगचा एक नवा ऑप्शन देण्यात येईल, ज्यावर क्लिक केल्यानंतर वरील पाच गेम्स स्क्रिनवर दिसतील. त्यातल्या कोणत्याही गेमवर क्लिक करून तुम्ही गेम्सचा आनंद घेऊ शकाल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.