मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Hackers च्या निशाण्यावर तुमचा Smartphone? डेटाचोरीला असा घाला आळा

Hackers च्या निशाण्यावर तुमचा Smartphone? डेटाचोरीला असा घाला आळा

अनेकदा काही अनोळखी अ‍ॅपचा वापर करून हॅकर्स युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये काही घातक व्हायरस घुसवतात. त्याद्वारे युजर्सच्या खाजगी (personal data in smartphone) डाटा आणि त्याच्या माहितीवर पाळत ठेवली जाते. अनेकदा काही रिपोर्ट्समधून अशा काही घटनांचा उलगडा झालेला आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : सध्या देशात आणि जगभरात स्मार्टफोन्स वापरणाऱ्यांची संख्या शेकडो कोटींच्या घरात आहे. तर दुसरीकडे Smartphone Hacking च्या प्रकरणातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे युजर्सच्या खाजगी डेटाच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमी उपस्थित होत असतो. हॅकर्स काही विशिष्ट अ‍ॅपचा वापर करून युजर्सचा डाटा (Hackers collecting personal data in smartphone) चोरत असतात. अनेकदा ही धक्कादायक गोष्ट युजर्सच्या लक्षात येईपर्यंत फार वेळ झालेला असतो.

काही अनोळखी अ‍ॅपचा वापर करून हॅकर्स युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये धोकादायक व्हायरस घुसवतात. त्याद्वारे युजर्सच्या खाजगी (personal data in smartphone) डेटा आणि त्याच्या माहितीवर पाळत ठेवली जाते. रिपोर्ट्समधून अशा अनेक घटनांचा उलगडा झालेला आहे. त्यामुळे आता स्मार्टफोनला सुरक्षितरित्या (apps collecting personal information) वापरणं हे देखील युजर्ससाठी एक मोठं चॅलेंज ठरत आहे. स्मार्टफोन आणि खाजगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

या 6 गोष्टी लक्षात ठेवून करा Smart Shopping; फसव्या ऑफर्स, कर्जापासून राहाल दूर

डेटाचोरीची ही आहेत लक्षणं -

जर स्मार्टफोन कमी वापरुनही सातत्याने गरम होत असेल, तर व्हायरस असण्याची शक्यता असू शकते. त्याचबरोबर जर इंटरनेट डेटा लवकर संपत असेल आणि कॉलिंगचं बिल जास्त येत असेल, तर संबंधित स्मार्टफोनचा अ‍ॅक्सेस हॅकर्सकडे असण्याची शक्यता असते. युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये गरजेपेक्षा जास्त जाहिराती येत असतील तर हे ही हॅकिंगचंच लक्षण आहे.

Charging नंतरही मोबाइल जास्त वेळ चालत नाही? असं वाढवा Battery लाइफ

या जाहिरातींद्वारे व्हायरस स्मार्टफोनमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे जर युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये सतत Spam मॅसेजेस येत असतील तर हॅकर्सकडून संबंधित फोनशिवाय दुसऱ्या डिव्हाईसमध्येही हा व्हायरस युजर्सच्या फोन लिस्टमध्ये असलेल्या इतर लोकांच्या स्मार्टफोनमध्ये घुसवण्याचा प्रयत्न हॅकर्सचा असतो.

Google Phones चं सीक्रेट फीचर, प्रायव्हेट फोटो Lock केल्यानंतर कुठेच नाही दिसणार

या गोष्टींची घ्या खबरदारी -

युजर्सला खाजगी डेटा चोरीला आळा घालायचा असेल, तर त्यासाठी स्मार्टफोन्समध्ये थर्ड पार्टी अ‍ॅपचा वापर टाळायला हवा. त्याचबरोबर अनोळखी असलेल्या कोणत्याही लिंक्सवर क्लिक करू नये. त्यासाठी सगळ्यात सुरक्षित कृती म्हणजे स्मार्टफोन्समध्ये स्ट्राँग पासवर्ड्स वापरायला हवे. पासवर्डमध्ये Alphabets पासून नंबर्सचाही समावेश असायला हवा.

First published:
top videos

    Tags: Apps, Online fraud, Smartphones, User data