मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

फेसबुकचा आणखी एक मोठा निर्णय, facial recognition केलं बंद!

फेसबुकचा आणखी एक मोठा निर्णय, facial recognition केलं बंद!

मेटा या नावाने फेसबुक आता ओळखले जाणार आहे. पण, या नव्या बदलापाठोपाठ आता फेसबुकने आणखी काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेटा या नावाने फेसबुक आता ओळखले जाणार आहे. पण, या नव्या बदलापाठोपाठ आता फेसबुकने आणखी काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेटा या नावाने फेसबुक आता ओळखले जाणार आहे. पण, या नव्या बदलापाठोपाठ आता फेसबुकने आणखी काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 02 नोव्हेंबर : सोशल मीडियातील दादा कंपनी असलेल्या फेसबुकने (facebook) अलीकडे आपलं नामकरण केलं आहे. मेटा (Meta) या नावाने फेसबुक आता ओळखले जाणार आहे. पण, या नव्या बदलापाठोपाठ आता फेसबुकने आणखी काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकने आता facial recognition बंद करण्याची घोषणा केली आहे.

फेसबुकने अलीकडे मेटा हे नाव धारण केले आहे. फेसबुक एक ब्लॉग प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, या पुढे फेसबुक facial recognition प्रणाली ही बंद करण्यात येणार आहे. या प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे १ अब्जाहून अधिक लोकांच्या चेहऱ्यांचे टेम्पलेट हटवले जाणार आहे. दररोज 600 मिलियन अकाऊंट facial recognition प्रणालीचा वापर करत असतात.

अशोक चव्हाणांना पुन्हा मुख्यमंत्री करणार, काँग्रेस नेत्याचे मोठे विधान

आता ही प्रणाली बंद करण्यात आल्यामुळे यापुढे फेसबुकमध्ये फोटो आणि व्हिडीओमधून लोकांची ओळख होणार नाही. आपण बऱ्याच वेळा फोटो टॅग करत असताना चेहऱ्यावर नाव येतात, ही प्रक्रिया आता बंद होईल.

facial recognition या पद्धतीबद्दल अनेक लोकांनी चिंता व्यक्त केली होती. याबद्दल अनेक वादही झाले होते. त्यामुळे कंपनीने facial recognition प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘मेटाव्हर्स’ म्हणजे नेमकं आहे तरी काय?

दरम्यान, फेसबुक (Facebook) आता मेटा (Meta) या नावाने ओळखलं जाणार आहे. आता यापुढे कंपनी व्हर्चुअल रिॲलिटीमध्येही पाऊल ठेवणार आहे. काही दिवसांपूर्वीच फेसबुकचे CEO मार्क झुकेरबर्ग यांनी कंपनीचं नाव बदललं तेव्हापासूनच मेटाव्हर्स (Metaverse) या शब्दाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे; पण हे मेटाव्हर्स म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ काय होतो? आपल्या आयुष्यावर याचा कसा परिणाम होऊ शकतो आणि त्याचा नेमका काय उपयोग होऊ शकतो असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. चला तर मग जाणून घेऊ या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं...

लांब बसूनही जवळ बसल्याचा आभास

मेटाव्हर्सबद्दल थोडा वेगळ्या प्रकारे विचार होणे गरजेचे आहे. सध्या इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. काही दिवसांनी तर आपल्याला इंटरनेटशिवाय आयुष्याचा विचारही करता येणार नाही. त्या वेळेस आपली सगळी कामं मेटाव्हर्सच्या माध्यमातून होतील. मेटाव्हर्स म्हणजे इंटरनेटवरचं असं वातावरण जिथं आपण फक्त स्क्रीनवर बघून उपस्थित राहू शकू, असं मार्क झुकेरबर्ग यांनी मेटाव्हर्सबद्दल म्हटलं होतं. म्हणजेच अगदी लांब लांब बसलेले (अगदी एकाच वेळेस वेगवेगळ्या देशांमध्ये) लोक एकाच वेळेस व्हर्चुअल कम्युनिटीच्या (Virtual Community) माध्यमातून एकमेकांना भेटू शकतील, एकत्र काम करू शकतील किंवा अगदी खेळूही शकतील. हे सगळं व्हर्चुअल रिॲलिटी हेडसेट्स (Virtual Reality Headsets), ऑग्मेंटेड रिॲलिटी ग्लासेस (Augmented Reality Glasses), स्मार्टफओन्स आणि अन्य उपकरणांच्या मदतीनं भविष्यात शक्य होऊ शकेल. थोडक्यात मेटाव्हर्समुळे अगदी हवं तसं आभासी जग निर्माण करता येऊ शकतं.

हे समजून घेणं किंवा समजावणं इतकं कठीण आहे, तर मग हे काम प्रत्यक्ष करणं किती अवघड असेल. पण तुमच्या विचारांची झेप जिथपर्यंत जाऊ शकते, ते सगळं कॉप्युटर आणि इंटरनेटच्या जगात करणं शक्य आहे. म्हणजेच तुमचे विचार, तुमची स्वप्न प्रत्यक्षात उतरणं शक्य आहे. थोडक्यात तुमच्या कल्पनेतील प्रत्येक गोष्ट या आभासी जगात होऊ शकते.

मेटाव्हर्समध्ये काय काय करता येऊ शकतं?

जे तुम्हाला करायची इच्छा आहे ते सगळं तुम्ही मेटाव्हर्सच्या माध्यमातून करू शकता. म्हणजे जगात कुठेही सुरू असलेल्या व्हर्चुअल कॉन्सर्टला (Virtual Concert) उपस्थित राहू शकता, ऑनलाईन ट्रिपला (Online Trip) जाऊ शकता, एखादं आर्टवर्क करू शकता आणि बघूही शकता. अगदी डिजिटल कपडे ट्राय करू शकता, ते खरेदी करू शकता. अशा जगात वर्क फ्रॉम होम म्हणजे अगदी सर्वसामान्य गोष्ट असेल. तुम्ही घरात बसला असाल तरी तुम्हाला ऑफिसमध्ये बसल्याचा भास (Virtual Office Meeting) होईल. कधीही तुम्ही मीटिंग घेऊ शकता आणि एकाच खोलीत बसून आपण चर्चा केल्याचा भास मीटिंगमध्ये सहभागी झालेल्यांना होईल.

First published: