जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / मोबाइल SIM Card बाबतच्या या नियमांत सरकारकडून बदल, तुम्हाला असा होणार फायदा

मोबाइल SIM Card बाबतच्या या नियमांत सरकारकडून बदल, तुम्हाला असा होणार फायदा

फोनमधील डेटा डिलीट करण्यासाठी Erase Device वर क्लिक करावं लागेल. आणखी एकदा क्लिक केल्यानंतर Gmail Password टाकावा लागेल.

फोनमधील डेटा डिलीट करण्यासाठी Erase Device वर क्लिक करावं लागेल. आणखी एकदा क्लिक केल्यानंतर Gmail Password टाकावा लागेल.

आता कोणताही नवा मोबाइल नंबर घेण्यासाठी KYC पूर्णपणे डिजीटलरित्या होणार आहे. KYC साठी कोणताही फॉर्म जमा करावा लागणार नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : सध्याच्या काळात मोबाइल सर्वांसाठी महत्त्वाची, गरजेचं वस्तू बनला आहे. अनेक काम मोबाइलद्वारेच एका क्लिकवर केली जातात. सरकारने मोबाइल नंबर, टेलिफोन कनेक्शनशी संबंधित काही नियमांत बदल केले आहेत. आता कोणताही नवा मोबाइल नंबर घेण्यासाठी KYC पूर्णपणे डिजीटलरित्या होणार आहे. KYC साठी कोणताही फॉर्म जमा करावा लागणार नाही. पोस्टपेड, प्रीपेड, सिम कार्ड पोर्ट करण्यासाठीही आता फॉर्म भरण्याची गरज लागणार नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखालील कॅबिनेट बैठकीत या निर्णयाला मंजूरी देण्यात आली. सरकारने मोबाइलसंबंधी नियमांत बदल करुन सेल्फ KYC ची परवानगी दिली आहे. हे KYC App आधारे होईल. या e-KYC साठी केवळ 1 रुपये चार्ज द्यावा लागेल. तसंच Prepaid to Postpaid आणि Postpaid to Prepaid करण्यासाठीही KYC ची आवश्यकता नसेल. टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना KYC साठी डॉक्युमेंट मागतात. जर ग्राहकाने ऑनलाइन डॉक्युमेंट अपलोड करुन KYC केल्यास त्याला सेल्फ KYC म्हटलं जातं. हे वेबसाइट किंवा App द्वारे केलं जातं.

GPay वर केवळ 2 मिनिटांत काढा Online FD, पाहा सोपी प्रोसेस

KYC साठी टेलिकॉम कंपन्या ग्राहकांकडे काही डॉक्युमेंट्स मागतात, त्यासाठी ग्राहकांना टेलिकॉम एजेन्सी किंवा फ्रेंचाइजीकडे जावं लागतं. परंतु आता घरबसल्या स्वत: सेल्फ KYC करता येणार आहे. त्यासाठी कंपनीच्या वेबसाइट किंवा App वर डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील.

केवळ 1 मेसेज आणि कायमची बंद होईल Corona Caller Tune, अशी करा सोपी प्रोसेस

ग्राहकांना आता KYC साठी कोणतेही डॉक्युमेंट, फॉर्म जमा करावे लागणार नाहीत. सिम कार्ड बदलण्यासाठीही आता डिजीटल KYC करण्यात येईल. नवा नंबर घेणं, टेलिफोन कनेक्शन घेण्यासाठी KYC पूर्णपणे डिजीटल असेल. Prepaid to Postpaid आणि Postpaid to Prepaid करण्यासाठी प्रत्येकवेळी KYC प्रोसेस करावी लागते. परंतु हे काम आता 1 रुपयांत तेही डिजीटल स्वरुपात होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात