नवी दिल्ली, 28 जानेवारी : टेलिकॉम कंपन्यांना टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (
TRAI) ने काही नवे नियम लागू केले आहेत. TRAI ने वॅलिडिटीबाबत टेलिकॉम कंपन्यांना
(Telecom Companies) आदेश दिले आहेत. कमीत-कमी एक प्लॅन
(Recharge Plan) पूर्ण महिन्यासाठी वैध असावा. प्रत्येक कंपनीच्या प्लॅनमध्ये एक स्पेशल व्हाउचर, एक कॉम्बो व्हाउचर संपूर्ण महिन्यासाठी वैध ठेवावा लागेल.
28 दिवसांच्या वॅलिडिटीबाबत तक्रारी -
TRAI ने रिचार्जबाबत निर्देश दिले आहेत. जो प्लॅन असेल, तो त्याच तारखेला पुन्हा रिचार्ज होईल याची काळजी घ्यावी, जेणेकरुन ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये. TRAI कडे याबाबत ग्राहकांकडून सतत तक्रारी येत होत्या. ग्राहकांच्या मते कंपन्या, टॅरिफची वैधता अर्थात वॅलिडिटी कमी करत आहेत. ही वॅलिडिटी एका संपूर्ण महिन्याऐवजी 28 दिवस करत आहेत. त्यावर TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना हे निर्देश दिले आहेत.
TRAI चे टेलिकॉम कंपन्यांना निर्देश -
TRAI याबाबत सांगितलं, की टेलिकॉम कंपन्यांकडून 28 दिवसांच्या, एका महिन्याहून कमी वॅलिडिटी असणाऱ्या टॅरिफ प्लॅनबाबत सातत्याने तक्रारी आल्या. कंपन्या संपूर्ण 30 दिवसांचा वॅलिडिटी असणारा टॅरिफ प्लॅन देत नाही. परंतु आता यात बदल होतील. यासाठी TRAI ने सर्व कंपन्यांना आदेश दिले आहेत. नियमांत सुधारणा लागू झाल्यानंतर ग्राहकांना योग्य ती वॅलिडिटी आणि कालावधीचे प्लॅन निवडण्यासाठी अधिक पर्याय असतील असं टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने सांगितलं.
दरम्यान, आता SMS द्वारे UPI पेमेंट करता येणार आहे. यामुळे इंटरनेट नसतानाही UPI Payment करणं शक्य होणार आहे. टेलिकॉम ऑपरेटरच्या मदतीने युजर्सच्या मोबाइल फोनमध्ये टेक्निक जोडलं जाईल. यासाठी युजर्सला टेलिकॉम स्टोरवर जावून हे काम करावं लागेल. पेमेंटसाठी टेलिकॉम नेटवर्कचा वापर केला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.