Home /News /technology /

Microsoft Windows 11 लाँच, 6 वर्षानंतर नवं अपडेट; युजर्सला मिळणार हे खास फीचर्स

Microsoft Windows 11 लाँच, 6 वर्षानंतर नवं अपडेट; युजर्सला मिळणार हे खास फीचर्स

Windows 11 मध्ये अनेक नवे फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने या ऑपरेटिंग सिस्टमला फ्रेश लुक दिला असून, नव्या थीम्स आणि ग्राफिक्सही अपडेट केलं आहे.

    नवी दिल्ली, 25 जून: मायक्रोसॉफ्टने (Microsoft) आपलं नवं ऑपरेटिंग सिस्टम Windows 11 लाँच केलं आहे. Windows 11 मध्ये अनेक नवे फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने या ऑपरेटिंग सिस्टमला फ्रेश लुक दिला असून, नव्या थीम्स आणि ग्राफिक्सही अपडेट केलं आहे. टास्कबार पूर्णपणे बदलला आहे. तर फाईल मॅनेजमेंटसाठीही नवे फीचर्स दिले आहेत. मायक्रोसॉफ्टच्या Windows 11 मध्ये Start Menu वेगळा असेल, ज्यात आयकॉन्सही दिले जातील. शिवाय रिकमेंडेड सेक्शनही अॅड करण्यात आलं आहे. रिसेंट फाईल्ससाठी विविध ऑप्शन दिले आहेत. Microsoft ने आपल्या ब्लॉगद्वारे दिलेल्या माहितीनुसार, हे ऑपरेटिंग सिस्टम या वर्षाअखेरीस कम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट्स अशा डिव्हाईसेसवर इन्स्टॉल केलं जाईल. याबाबतची तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही. Windows 11 रोल आउट झाल्यानंतर ते Dell, HP, Asus, Lenovo सारख्या OEM डिव्हाईससाठी उपलब्ध होईल. महत्त्वाची बाब म्हणजे Windows 10 प्रमाणे हेदेखील फ्री अपग्रेडसह उपलब्ध केलं जाईल. Google वर ही गोष्ट सर्च करत असाल तर वेळीच व्हा सावध; महिलेची अडीच लाखाची फसवणूक Windows 11 फीचर्स - Microsoft चं हे नेक्स्ट जनरेशन ऑपरेटिंग सिस्टम पूर्णपणे रिडिझाईन करण्यात आलं आहे. याच्या बूट स्क्रिनपासून इंटरफेस आयकॉन्सपर्यंत बदल पाहायला मिळणार आहे. Start मेन्यू सेंटरला देण्यात आला आहे. तर युजर्सकडून मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे अॅप्स एका क्लिकवर स्क्रोल करता येणार आहेत. टास्क बार सेंटरला अलाईन करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत मिळतोय Apple चा हा पॉप्युलर iPhone, पाहा ऑफर Windows 11 मध्ये Microsoft Teams इंटिग्रेड केलं आहे. नवं ऑपरेटिंग सिस्टम टच फ्रेंडली आहे. याला टॅबलेट्स आणि टच स्क्रिन PC च्या दृष्टीने डिझाईन करण्यात आलं आहे. तसंच यात डार्क आणि लाईट मोडही मिळतो. Windows 11 Gaming - Microsoft ने आपल्या अपकमिंग Windows 11 ला गेमिंग फ्रेंडली बनवलं आहे. यात ऑटो HDR फीचर देण्यात आलं आहे, ज्यामुळे गेमिंग आणखी जबरदस्त होऊ शकतं. Xbox सीरीजने इन्सपायर होऊन Windows 11 मध्ये कंसोल गेमिंग देण्याचा प्रयत्न केला आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Microsoft, Tech news

    पुढील बातम्या