मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत मिळतोय Apple चा हा पॉप्युलर iPhone, पाहा ऑफर

आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत मिळतोय Apple चा हा पॉप्युलर iPhone, पाहा ऑफर

फ्लिपकार्ट (Flipkart) वरील मोबाईल बोनान्झा सेलच्या माध्यमातून युजर्स कमी किमतीत आयफोन 12 मिनी (iPhone 12 Mini) खरेदी करु शकणार आहेत.

फ्लिपकार्ट (Flipkart) वरील मोबाईल बोनान्झा सेलच्या माध्यमातून युजर्स कमी किमतीत आयफोन 12 मिनी (iPhone 12 Mini) खरेदी करु शकणार आहेत.

फ्लिपकार्ट (Flipkart) वरील मोबाईल बोनान्झा सेलच्या माध्यमातून युजर्स कमी किमतीत आयफोन 12 मिनी (iPhone 12 Mini) खरेदी करु शकणार आहेत.

  नवी दिल्ली, 23 जून : अ‍ॅपलच्या (Apple) आयफोन्सचा (iPhone) एक वेगळा चाहता वर्ग आहे. आयफोनमधील वैशिष्टपूर्ण फीचर्स हे या मागील प्रमुख कारण म्हणता येईल. अ‍ॅपल आयफोन संदर्भात कोणतीही ऑफर उपलब्ध झाल्यास युजर्स तिचा लाभ प्राधान्याने घेताना दिसतात. आयफोन प्रेमींसाठी फ्लिपकार्टने अशीच एक अनोखी ऑफर सध्या आणली आहे. फ्लिपकार्ट (Flipkart) वरील मोबाईल बोनान्झा सेलच्या माध्यमातून युजर्स कमी किमतीत आयफोन 12 मिनी (iPhone 12 Mini) खरेदी करु शकणार आहेत.

  फ्लिपकार्टवर मोबाईल बोनान्झा सेल (Sale) सुरू आहे. या सेलमधून तुम्ही कमी किमतीत सॅमसंग, मोटोरोला आणि अ‍ॅपल कंपन्यांचे प्रिमियम स्मार्टफोन्स घेऊ शकता. हा फोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

  फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना आयफोन 12 मिनीवर 6 हजार रुपयांची सूट मिळवत हा फोन खरेदी करता येणार आहे. या फोनची किंमत 66,900 रुपये असून तो 61,900 रुपयांदरम्यान खरेदी करता येणार आहे. म्हणजेच आयफोन 12 मिनीवर 5 हजार रुपयांची सूट मिळवत तो खरेदी करता येणार आहे.

  (वाचा - Ration Card : स्वस्त दरातील धान्य मिळण्यास समस्या येतेय? या नंबरवर करा तक्रार)

  या फोनला 5.4 इंची सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. आयफोन 12 मिनीमध्ये ड्युअल सिम सपोर्ट मिळणार आहे. या फोनमध्ये युजर्स नॅनो (Nano) आणि ई-सिमचा (E-Sim) वापर करु शकणार आहेत. हा फोन iOS 14 या सॉफ्टवेअरवर काम करतो. यात A14 बायोनिक चीप देखील आहे.

  (वाचा - 1.50 लाख रुपयांत खरेदी करा Maruti आणि Honda कार, मिळेल 7 दिवसांचं फ्री ट्रायल)

  फोनमधील कॅमेरा आहे खास -

  आयफोन 12 मिनीमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी सेन्सर 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड आहे. दुसरा 12 मेगापिक्सलचा वाईड सेन्सर आहे. या आयफोनमधील कॅमेरामध्ये नाईट मोड, डिप फ्युजन, स्मार्ट HDR 3, 4K नाईट मोड, 4k Dolby Vision HDR रेकॉर्डिंग असे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमधील फ्रंटला 12 मेगापिक्सलचा ट्रु डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हा सेन्सर नाईट मोड आणि 4k Dolby Vision HDR ला सपोर्ट करतो. हा फोन IP68 वॉटर रेसिसटंट फीचर्ससह उपलब्ध आहे. iPhone 12 mini 64GB,128GB आणि 256GB अशा तीन स्टोरेज वेरिएंटमध्ये (Storage Variant) उपलब्ध आहे.

  First published:

  Tags: Apple, Iphone